सेरेना, फेडररची १८व्या ग्रॅण्डस्लॅमकडे वाटचाल

By Admin | Updated: August 28, 2014 01:50 IST2014-08-28T01:50:55+5:302014-08-28T01:50:55+5:30

१८ व्या ग्रॅण्डस्लॅम किताबासाठी कोर्टवर उतरलेली सेरेना विलियम्स आणि रॉजर फेडरर यांनी आगेकूच केली आहे.

Serena, Federer's 18th Grandslam to move | सेरेना, फेडररची १८व्या ग्रॅण्डस्लॅमकडे वाटचाल

सेरेना, फेडररची १८व्या ग्रॅण्डस्लॅमकडे वाटचाल

न्यूयॉर्क : १८ व्या ग्रॅण्डस्लॅम किताबासाठी कोर्टवर उतरलेली सेरेना विलियम्स आणि रॉजर फेडरर यांनी आगेकूच केली आहे. त्यांनी पहिल्या फेरीत सहज विजय साजरा केला. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या अमेरिकेच्या सेरेनाने महिला एकेरीच्या लढतीत बिगरमानांकित टेलर टाऊनसेंडवर ६-१, ६-१ असा विजय साजरा केला, तर पुरुष एकेरीत स्वित्झर्लंडच्या फेडररने आॅस्ट्रेलियाच्या मारिंको मातोसेविकचा तीन सेटमध्ये चाललेल्या लढतीत ६-३, ६-४, ७-६ असा पराभव केला.
या दोन्ही दिग्गजांनी जरी आपल्या कारकिर्दीत १७-१७ ग्रॅण्ड स्लॅम पटकावले असले तरी आजचा दिवस गाजवला तो वाईल्ड कार्ड एन्ट्री मिळवलेल्या अमेरिकेच्या १५ वर्षीय कॅथरीन बैलिस हिने. तिने १२व्या मानांकित स्लोवाकियाच्या डोमिनिका सिबुलकोवावर ६-१, ४-६, ६-४ असा विजय मिळवून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. फेडररने पहिल्या फेरीत मिळवलेला हा विजय खूप खास होता. त्याचाा लहानपणीचा हिरो एनबीए स्टार मायकल जॉर्डन हि लढत पाहण्यासाठी उपस्थित होता. पाचवेळा अमेरिकन ओपन जिंकणाऱ्या फेडररसाठी पहिले दोन सेट सोपे गेले, परंतु तिसऱ्या सेटमध्ये मातोसेविकने त्याचा घामटा काढला. टायब्रेकरमध्ये मातोसेविकने हि लढत खेचली. त्यात फेडीने ७-४ असा विजय मिळवून आगेकूच केली. फेडररला पुढील फेरीत आॅस्ट्रेलियाच्या सॅम ग्रोथ याच्याशी मुकाबला करावा लागेल. त्याने स्पेनच्या एलबर्ट रामोस याला ६-३, ७-६, ६-३ असे पराभूत केले. इतर महत्वाच्या लढतीत स्पेनच्या डेवीड फेररने बोस्नियाच्या दामिर जुमूरचा ६-१, ६-२, २-६, ६-२ असा पराभव केला, तर १०व्या मानांकित जपानच्या केई निशिकोरीने अमेरिकेच्या वायने ओडेनसिकवर ६-२, ६-४, ६-२ असा विजय मिळवला.
महिला एकेरीत तिसरी मानांकित आणि २०११ची विम्बल्डन चॅम्पियन झेक प्रजासत्ताकची पेत्रा क्वितोवा हिने पहिल्या फेरीत फ्रान्सच्या क्रिस्टीना म्लोडेनोविकचा ६-१, ६-० असा सरळ सेटमध्ये पराभव केला. वर्षांच्या तिन्ही ग्रॅण्ड स्लॅमच्या उपांत्य फेरीत प्रवेश करणाऱ्या २० वर्षीय इयुजिनी बुकार्डने बेलारुसच्या ओल्गा गोवोरसोवाचा ६-२, ६-१ ने पराभव केला. आठव्या मानांकित सर्बियाच्या एना इवानोविकने अमेरिकेच्या एलीसन रिस्केवर सरळ सेटमध्ये ६-३, ६-० असा विजय साजरा केला. ११व्या मानांकित इटलीच्या फ्लाविया पेनेटाने जर्मनीच्या जुलिआ जॉर्सिचा ६-३, ४-६, ६-१ असा आणि स्पेनच्या कार्ला सुआरेज नवारो आॅस्ट्रेलियाच्या अजीला टामजानोविकचा ३-६, ६-२, ६-१ असा पराभव करून आगेकूच केली. मात्र माजी फ्रेंच ओपन चॅम्पियन रुसची स्वेत्लाना कुज्नेत्सोवाला पराभवाचे तोंड पहावे लागले. तिला न्युझीलंडच्या मारिना एराकोविकने ६-३, २-६, ६-७ असे पराभूत केले. (वृत्तसंस्था)

Web Title: Serena, Federer's 18th Grandslam to move

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.