सेरेना-कॅरोलिन अंतिम लढत

By Admin | Updated: September 7, 2014 01:24 IST2014-09-07T01:24:55+5:302014-09-07T01:24:55+5:30

सेरेना विल्यम्स, डेन्मार्कची अनुभवी खेळाडू कॅरोलिन वोज्नियाकी यांनी अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रतिस्पर्धी खेळाडूंना धूळ चारून फायनलमध्ये प्रवेश केला़

Serena-Caroline final fight | सेरेना-कॅरोलिन अंतिम लढत

सेरेना-कॅरोलिन अंतिम लढत

न्यूयॉर्क : जागतिक क्रमवारीतील अमेरिकेची अव्वल टेनिसपटू सेरेना विल्यम्स, डेन्मार्कची अनुभवी खेळाडू कॅरोलिन वोज्नियाकी यांनी अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रतिस्पर्धी खेळाडूंना धूळ चारून फायनलमध्ये प्रवेश केला़
अव्वल मानांकित सेरेना हिने उपांत्य फेरीच्या सामन्यात आपल्या आक्रमक खेळाच्या बळावर 17वे मानांकनप्राप्त रशियाच्या एकातेरिना मकारोव्हा हिच्यावर सरळ सेटमध्ये 6-1, 6-3 अशा फरकाने मात करीत थाटात अंतिम फेरीत प्रवेश केला़ 
दुस:या उपांत्य फेरीच्या सामन्यात वोज्नियाकी हिने आपले विजयी अभियान कायम राखताना चीनच्या पेंग शुआई हिचे आव्हान 7-6, 4-3 असे मोडून काढताना स्पर्धेच्या फायनलमध्ये मजल मारली़ विशेष म्हणजे या लढतीत शुआईला दुखापत झाली होती़, तरीही तिने वोज्नियाकीचा सामना केला; मात्र तिला या लढतीत विजय मिळविता आला नाही़ रविवारी होणा:या फायनलमध्ये 17 वेळा ग्रँडस्लॅम विजेत्या सेरेनाचा सामना वोज्नियाकीशी होणार आह़े स्पर्धेत जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या सेरेना हिने उपांत्य फेरीत मकारोव्हा हिच्यावर अवघ्या 6क् मिनिटांत सरशी  साधली़ या लढतीत सेरेना हिने 5 एस आणि 24 विनर्स लगावल़े
स्पर्धेच्या चौथ्या फेरीत रशियाची अनुभवी टेनिसपटू मारिया शारापोव्हा हिला धूळ चारणा:या वोज्नियाकी हिला 2क्क्9मध्ये अमेरिकन ओपनच्या फायनलमध्ये किम क्लाईस्टर्सकडून पराभवाचे तोंड पाहावे लागले होत़े त्यानंतर पहिल्यांदाच ती एखाद्या ग्रँडस्लॅमच्या अंतिम फेरीत पोहोचली आह़े दुसरीकडे सेरेना विल्यम्स हिने स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश केल्यामुळे आनंद व्यक्त केला आह़े फायनलमध्येही विजयी अभियान कायम राखण्याचा प्रयत्न करणार असल्याचे तिने म्हटले आह़े विशेष म्हणजे या वर्षी एकाही ग्रँडस्लॅम स्पर्धेत सेरेनाला चौथ्या फेरीचा अडथळा पार करता आला नव्हता़ (वृत्तसंस्था)

 

Web Title: Serena-Caroline final fight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.