सचिन तेंडुलकर आणि सोनू निगमच्या फोटोमुळे खळबळ
By Admin | Updated: March 30, 2017 16:47 IST2017-03-30T16:31:09+5:302017-03-30T16:47:34+5:30
भारताचा महान खेळाडू सचिन तेंडुलकर आणि प्रसीद्ध गायक सोनू निगम यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल

सचिन तेंडुलकर आणि सोनू निगमच्या फोटोमुळे खळबळ
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 30 - भारताचा महान खेळाडू सचिन तेंडुलकर आणि प्रसीद्ध गायक सोनू निगम यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये आपआपल्या क्षेत्रात दिग्गज असलेल्या या दोघांची भूमिका मात्र बदललेली दिसतेय.
या फोटोत सचिन तेंडुलकरच्या हातात बॅट ऐवजी माईक दिसतोय तर सोनू निमगच्या हातात माईक ऐवजी बॅट आहे. त्यामुळे सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. या फोटोवरून सचिन आणि सोनू कोणत्यातरी खास प्रोजेक्टवर काम करत असल्याचे तर्क लावले जात आहेत. मात्र, दोघं नक्की कोणत्या प्रोजेक्टवर काम करत आहेत याबबात नेमकी माहिती मिळालेली नाही.
So what exactly is @sonunigam doing with a bat? And who is the other guy? is it @sachin_rt ?
— Noyon Jyoti Parasara (@NoyonSENSE) March 29, 2017
What this mystery project? pic.twitter.com/6fZ7AeHznp
नयन ज्योती पारासारा या ट्विटर हॅंडलवरून दोघांचा हा फोटो ट्विट केला. ट्विट करताना नयनने सचिन आणि सोनूला टॅग करून सोनू निगम बॅट सोबत काय करतोय आणि बाजूला असलेला व्यक्ती सचिन तेंडुलकर आहे का? हा रहस्यमयी प्रोजेक्ट कोणता आहे? याबाबत विचारणा केली.
नयनच्या ट्विटला रिट्विट करताना सचिनने सोनू निगमला टॅग करत प्रश्नार्थक चिन्हं टाकले आहेत. तर सोनूनेही सचिनच्या ट्विटला रिप्लाय देत केवळ स्माइली आणि विंक विंक असा मेसेज केला आहे.
. @sonunigam ????? https://t.co/dYAQii21ZA
— sachin tendulkar (@sachin_rt) March 29, 2017
यानंतर सचिन तेंडूलकर आणि सोनू निगम दोघं एखाद्या प्रोजेक्टवर एकत्र काम करत असल्याची जोरदार चर्चा आहे.
;) ;) wink wink https://t.co/vRACEqiJ50
— Sonu Nigam (@sonunigam) March 29, 2017