क्रीडा पानासाठी वरिष्ठ बॅडमिंटन खुली स्पर्धा पत्रपरिषदेत अस्मिता पाटील यांची माहिती : शनिवारी राज्यस्तरीय वेटरन्स बॅडमिंटन स्पर्धा

By Admin | Updated: September 1, 2015 21:38 IST2015-09-01T21:38:12+5:302015-09-01T21:38:12+5:30

जळगाव : महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त ५ सप्टेंबर रोजी राज्यस्तरीय खुल्या वेटरन्स बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती वेटरन्स बॅडमिंटन असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ.अस्मिता पाटील यांनी दिली.

Senior Badminton Open Competition Letter for Asmita Patil in the State Council for Sports: Saturday's State Veterans Badminton Tournament | क्रीडा पानासाठी वरिष्ठ बॅडमिंटन खुली स्पर्धा पत्रपरिषदेत अस्मिता पाटील यांची माहिती : शनिवारी राज्यस्तरीय वेटरन्स बॅडमिंटन स्पर्धा

क्रीडा पानासाठी वरिष्ठ बॅडमिंटन खुली स्पर्धा पत्रपरिषदेत अस्मिता पाटील यांची माहिती : शनिवारी राज्यस्तरीय वेटरन्स बॅडमिंटन स्पर्धा

गाव : महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त ५ सप्टेंबर रोजी राज्यस्तरीय खुल्या वेटरन्स बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती वेटरन्स बॅडमिंटन असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ.अस्मिता पाटील यांनी दिली.
स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा क्रीडा संकुलात सकाळी १० वाजता होईल. यावेळी जलसंपदामंत्री गिरीश महाजन, जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल, पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर, जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे - खेवलकर, खासदार ए.टी.पाटील, आमदार सुरेश भोळे, जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष अशोक जैन उपस्थित राहणार आहे.
या स्पर्धेत ३५ वर्षावरील खेळाडूंना प्रवेश दिला जाणार आहे. प्रवेशासाठी ऑनलाईन अर्र्ज मागवण्यात आले आहेत. या स्पर्धेत ३५ ते ४० , ४१ ते ४५, ४६ ते ५०, ५१ ते ५५ , ५६ ते ६० असे वयोगट करण्यात आले आहेत. महिला एकेरी व दुहेरी, पुरूष एकेरी व दुहेरी आणि मिश्र दुहेरीत सामने घेतले जातील. विजेत्या खेळाडूंना रोख बक्षिसे, चषक आणि प्रमाणपत्र देण्यात येईल. बक्षीस वितरण रविवारी दुपारी ४ वाजता जिल्हा क्रीडा संकुलात एकनाथराव खडसे यांच्या हस्ते होईल. यावेळी खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, आमदार सुरेश भोळे, आमदार गुरूमुख जगवाणी, आमदार स्मिता वाघ, आमदार उन्मेष पाटील उपस्थित राहतील.
स्पर्धर्ेच्या आयोजन समितीच्या अध्यक्ष म्हणून डॉ. अस्मिता पाटील तर सचिव म्हणून वृषाली पाटील काम पाहत आहेत. आयोजनासाठी डॉ.जे.बी. राजपूत, डॉ.तुषार उपाध्ये, सुनील रोकडे, दीपक आर्डे, हिरेन वेद, चेतना शाह, देविदास वेद, ॲड.सागर चित्रे, प्रवीण पाटील काम पाहत आहेत.

Web Title: Senior Badminton Open Competition Letter for Asmita Patil in the State Council for Sports: Saturday's State Veterans Badminton Tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.