सेमीफायनलआधी युवराज सिंगने दाखवली सुपर पॉवर
By Admin | Updated: June 14, 2017 15:17 IST2017-06-14T15:17:49+5:302017-06-14T15:17:49+5:30
दोन्ही संघाचे खेळाडू एकीकडे मैदानात घाम गाळत असताना युवराज सिंगने मैदानाबाहेर आपली सुपर पॉवर दाखवली आहे

सेमीफायनलआधी युवराज सिंगने दाखवली सुपर पॉवर
>ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 14 - सध्या आयसीसी चॅम्पिअन्स ट्रॉफी निर्णायक टप्प्यात पोहोचली असून भारत सेमीफायलनमध्ये पोहोचला आहे. गुरुवारी भारत आणि बांगलादेशदरम्यान सेमीफायनल होणार आहे. दोन्ही संघ अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी कसून सराव करत आहेत. दोन्ही संघाचे खेळाडू एकीकडे मैदानात घाम गाळत असताना युवराज सिंगने मैदानाबाहेर आपली सुपर पॉवर दाखवली आहे.
युवराज सिंगने इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ म्हणजे बांगलादेश खेळाडूंसाठी एक चेतावणीच आहे. या व्हिडीओत युवराज सिंग आपल्याकडे सुपर पॉवर असल्याप्रमाणे आपोआप दरवाजा उघडत आहे, आणि बंदही करत आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने हा व्हीडीओ शूट केला आहे.
भारत आणि बांगलादेश यांच्यात उद्या गुरुवारी बर्मिंगहॅममध्ये उपांत्य सामना होणार आहे. या सामन्याआधी युवराज सिंहने हा विनोदी व्हिडीओ शेअर केला आहे. युवराज सिंग आपल्या विनोदी स्वभावासाठी ओळखला जातो. ड्रेसिंग रुममध्येही युवराज सिंग इतर खेळाडूंच्या खोड्या काढत असतो.