सचिनने प्रणव धनावडेला दिली स्वाक्षरी असलेली स्वत: खेळलेली बॅट
By Admin | Updated: January 7, 2016 19:00 IST2016-01-07T19:00:11+5:302016-01-07T19:00:11+5:30
प्रणव धनावडेला सचिन तेंडुलकरने स्वत:ची बॅट सही करून भेट दिली आहे. नाबाद १००९ धावांसह विश्वलिक्रम करणा-या प्रणवचं सचिनने लगेच ट्विटरद्वारे अभिनंदन केलं होतं

सचिनने प्रणव धनावडेला दिली स्वाक्षरी असलेली स्वत: खेळलेली बॅट
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ७ - प्रणव धनावडेला सचिन तेंडुलकरने स्वत:ची बॅट सही करून भेट दिली आहे. नाबाद १००९ धावांसह विश्वलिक्रम करणा-या प्रणवचं सचिनने लगेच ट्विटरद्वारे अभिनंदन केलं होतं आणि तुला नवीन शिखरं गाठायची आहेत असा सल्लाही दिला होता.
प्रणवला मुंबई क्रिकेट असोसिएशनने स्कॉलरशिप दिली आहे तर महाराष्ट्र सरकारनेही त्याच्या कोचिंगचा शिक्षणाचा खर्च उचलण्याची तयारी केली आहे. आता सचिननेही स्वाक्षरी असलेली बॅट प्रणवला भेट दिली असून बीसीसीआयने हे वृत्त ट्विटरद्वारे दिलं आहे.