सहिनेच्या सात खेळाडूंची निवड

By Admin | Updated: September 4, 2015 22:46 IST2015-09-04T22:46:20+5:302015-09-04T22:46:20+5:30

सोलापूर: सोलापूर क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित विविध क्रीडा स्पर्धेत सकुबाई हिराचंद नेमचंद प्रशालेच्या खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले आह़े यातील सात यशस्वी खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आह़े शालेय कराटे स्पर्धेत 17 वर्षांखालील वयोगटात निरंजन मोहिते प्रथम, ऋषीकेश घाडगे द्वितीय, 34 किलो वजनी गटात अभिजित शेळके प्रथम, 70 किलो वजनी गटात र्शीधर पाठक याने प्रथम क्रमांक पटकावला़ प्रसाद साळुंके याने 60 किलो वजनी गटात तिसरा क्रमांक पटकावला़

Selection of seven players | सहिनेच्या सात खेळाडूंची निवड

सहिनेच्या सात खेळाडूंची निवड

लापूर: सोलापूर क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित विविध क्रीडा स्पर्धेत सकुबाई हिराचंद नेमचंद प्रशालेच्या खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले आह़े यातील सात यशस्वी खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आह़े शालेय कराटे स्पर्धेत 17 वर्षांखालील वयोगटात निरंजन मोहिते प्रथम, ऋषीकेश घाडगे द्वितीय, 34 किलो वजनी गटात अभिजित शेळके प्रथम, 70 किलो वजनी गटात र्शीधर पाठक याने प्रथम क्रमांक पटकावला़ प्रसाद साळुंके याने 60 किलो वजनी गटात तिसरा क्रमांक पटकावला़
शालेय कॅरम स्पर्धेत 17 वर्षांखालील वयोगटात र्शीनिवास भंडारे याने द्वितीय, दत्तात्रय अलकुंटे याने तृतीय क्रमांक पटकावला़ तलवारबाजी स्पर्धेत 17 वर्षे वयोगटात शंकर कुर्ले याने सायबर प्रकारात तृतीय क्रमांक पटकावला़ राज्यस्तरीय रस्सीखेच स्पर्धेसाठी शेजल जाधव, आदिती भुरळे, तृप्ती गुंड यांची निवड झाली आह़े राज्य जंप रोप स्पर्धेसाठी ज्ञानेश्वरी जोशी, अंजली बारंगुळे, वैष्णवी उप्पीन, प्रियांका सुलाखे यांची निवड झाली आह़े
या खेळाडूंना क्रीडाशिक्षक मुकुंद गिरी, क्रीडा विभाग प्रमुख वीरेश अंगडी यांचे मार्गदर्शन लाभल़े त्यांचे र्शी सरस्वती विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष मोहन दाते, कार्यवाह अँड. रघुनाथ दामले, मुख्याध्यपक धनंजय जोशी, उपमुख्याध्यापिका पद्मा माशाळ, पर्यवेक्षिका कल्पना झाडबुके यांनी कौतुक केल़े (क्रीडा प्रतिनिधी)
फोटोओळी-
शालेय विविध क्रीडा स्पर्धेत यश मिळविलेल्या सकुबाई हिराचंद नेमचंद प्रशालेच्या खेळाडूंसोबत वीरेश अंगडी, मुकुंद गिरी, मोहन दाते, अँड़ रघुनाथ दामले, धनंजय जोशी, पद्मा माशाळ, कल्पना झाडबुक़े

Web Title: Selection of seven players

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.