नव्या अध्यक्षाची निवड ४ आॅक्टोबरला

By Admin | Updated: September 29, 2015 23:24 IST2015-09-29T23:24:39+5:302015-09-29T23:24:39+5:30

बीसीसीआयने आपल्या नव्या अध्यक्षाच्या निवडीसाठी ४ आॅक्टोबर रोजी आमसभेची विशेष बैठक बोलाविली आहे. त्यात नागपूरचे अ‍ॅड. शशांक मनोहर सर्वांच्या पसंतीचे

The selection of the new President will be on October 4 | नव्या अध्यक्षाची निवड ४ आॅक्टोबरला

नव्या अध्यक्षाची निवड ४ आॅक्टोबरला

नवी दिल्ली : बीसीसीआयने आपल्या नव्या अध्यक्षाच्या निवडीसाठी ४ आॅक्टोबर रोजी आमसभेची विशेष बैठक बोलाविली आहे. त्यात नागपूरचे अ‍ॅड. शशांक मनोहर सर्वांच्या पसंतीचे उमेदवार म्हणून पुढे आले आहेत. प्रसारमाध्यमांना याची माहिती देताना बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनी सांगितले, ‘‘बैठक मुंबईत होणार आहे. नामांकन अर्जाची छाननी ३ आॅक्टोबर रोजी होईल. शशांक मनोहर सर्वसंमतीचे उमेदवार ठरले असून जर निवडणूक झाली तर एन. श्रीनिवासन यांना आपले मत देता येईल.’’ ठाकूर म्हणाले, ‘‘श्रीनिवासन बैठकीमध्ये सहभागी होऊ शकत नाहीत, पण त्यांना मत टाकता येईल.’’ मनोहर त्यांनी सुरुवातीला नकार दिल्यानंतर दुसऱ्यांदा हे पद स्वीकारण्यास मंजुरी दिली आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: The selection of the new President will be on October 4