मुंबई फुटबॉल संघाची निवड चाचणी
By Admin | Updated: February 6, 2017 01:13 IST2017-02-06T01:13:17+5:302017-02-06T01:13:17+5:30
धुळे येथे होणाऱ्या महाराष्ट्र राज्य आंतरजिल्हा सब ज्युनियर (१४ वर्षांखालील) फुटबॉल स्पर्धेसाठी मुलींच्या मुंबई संघाची निवड चाचणी पार पडणार आहे.

मुंबई फुटबॉल संघाची निवड चाचणी
मुंबई : धुळे येथे होणाऱ्या महाराष्ट्र राज्य आंतरजिल्हा सब ज्युनियर (१४ वर्षांखालील) फुटबॉल स्पर्धेसाठी मुलींच्या मुंबई संघाची निवड चाचणी पार पडणार आहे.
मुंबई जिल्हा फुटबॉल संघटनेच्या (एमडीएफए) वतीने होणारी ही निवड चाचणी होणार असून आझाद मैदान येथील मुंबई शालेय क्रीडा संघटना (एमएसएसए) मैदानावर ६ व ७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता ही निवड चाचणी पार पडेल. या निवड चाचणीमध्ये १ जानेवारी २००२ नंतर आणि ३१ डिसेंबर २००४ दरम्यान जन्मलेल्या मुलींना निवड चाचणीत सहभाग घेता येईल. खेळाडूंनी चाचणीसाठी येताना शाळेचे ओळखपत्र आणि फुटबॉल किट सोबत घेऊन बंधनकारक असल्याचे आयोजकांनी सांगितले.
अधिक माहितीसाठी एमडीएफए कार्यालयात संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (क्रीडा प्रतिनिधी)