भारतीय संघाची निवड आज

By Admin | Updated: May 20, 2015 01:31 IST2015-05-20T01:31:14+5:302015-05-20T01:31:14+5:30

बीसीसीआय राष्ट्रीय संघनिवड समितीच्या बुधवारी होणाऱ्या बैठकीत बांगलादेश दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड करण्यात येणार आहे.

The selection of the Indian team today | भारतीय संघाची निवड आज

भारतीय संघाची निवड आज

मुंबई : बीसीसीआय राष्ट्रीय संघनिवड समितीच्या बुधवारी होणाऱ्या बैठकीत बांगलादेश दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड करण्यात येणार आहे. आॅस्ट्रेलिया दौऱ्यात खेळलेला संघच बांगलादेश दौऱ्यासाठी कायम राखण्यात येणार असल्याचे संकेत मिळत असून आक्रमक फलंदाज विराट कोहलीकडे संघाचे नेतृत्त्व सोपविण्यात येणार आहे. बांगलादेश दौऱ्यात १० ते १४ जून या कालावधीत एक कसोटी सामना खेळला जाणार असून १८ जूनपासून मीरपूरमध्ये ३ वन-डे सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. कोहलीसह एकाही सीनिअर खेळाडूने संदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीकडे ‘ब्रेक’ची मागणी केलेली नाही.

Web Title: The selection of the Indian team today