वर्ल्डकपच्या संघातून सेहवाग, गंभीर, युवराजला डच्चू
By Admin | Updated: December 4, 2014 15:54 IST2014-12-04T15:22:11+5:302014-12-04T15:54:37+5:30
वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, गौतम गंभीर, झहीर खान, हरभजन सिंग यांना २०१५च्या वर्ल्डकपच्या संभाव्य ३० जणांच्या संघात स्थान मिळवता आलेले नाही.

वर्ल्डकपच्या संघातून सेहवाग, गंभीर, युवराजला डच्चू
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ४ - तब्बल दोन दशकानंतर भारताला २०११ चा वर्ल्डकप जिंकून देण्यात मोलाचा वाटा बजावणा-या वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, गौतम गंभीर, झहीर खान, हरभजन सिंग या दिग्गज खेळांडूना आगामी विश्वचषक स्पर्धेच्या संभाव्य खेळाडूंच्या यादीत स्थान मिळवता आलेले नाही. बीसीसीआयने विश्वचषकातील संभाव्य ३० खेळाडूंच्या नावांची यादी जाहीर केली असून या खेळाडूंना मात्र या यादीतून डच्चू देण्यात आला आहे.
मागचा वर्ल्डकप जिंकून देण्यात युवराज सिंगने मोठा वाटा बजावला होता, तर सेहवाग व गंभीरनेही त्याला मोलाची साथ दिली होती. मात्र गेल्या चार वर्षांत या खेळांडूचा आलेख खालावला असून त्यांना चांगली कामगिरी करता आलेली नाही. यामुळेच सिलेक्टर्सनी या पाच जणांऐवजी तरूण खेळाडूंना संघात स्थान देण्याचा निर्णय घेतल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
२०१५ वर्ल्डकप संभाव्य संघातील खेळाडू :
महेंद्रसिंग धोनी, शिखर धवन, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, रॉबिन उथप्पा, विराट कोहली, सुरेश रैना, अंबती रायुडू, केदार जाधव, मनोज तिवारी, मनिष पांडे, वृद्धिमान सहा, संजू सॅमसन, आर. अश्विन, परवेझ रसूल, कर्ण शर्मा, अमित मिश्रा, रविंद्र जाडेजा, अक्षर पटेल, इशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, उमेश यादव, व्ही. अॅरॉन, धवल कुलकर्णी, स्टुअर्ट बिन्नी, मोहित शर्मा, अशोक दिंडा, कुलदीप यादव आणि मुरली विजय.