शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
4
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
5
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
6
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
7
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
8
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
9
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
10
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
11
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
12
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
13
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
14
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
15
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
16
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
17
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
18
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
19
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
20
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईमध्ये आज रंगणार दुसरा सराव सामना

By admin | Updated: January 12, 2017 01:26 IST

पहिल्या सराव सामन्यात झालेल्या पराभवानंतर भारत ‘अ’ संघ इंग्लंड इलेव्हनविरुद्ध दुसरा सराव सामना गुरुवारी खेळेल.

मुंबई : पहिल्या सराव सामन्यात झालेल्या पराभवानंतर भारत ‘अ’ संघ इंग्लंड इलेव्हनविरुद्ध दुसरा सराव सामना गुरुवारी खेळेल. पहिल्या सामन्यात महेंद्रसिंग धोनीने नेतृत्व केल्यानंतर, या सामन्यात मुंबईकर अजिंक्य रहाणे भारतीय संघाचे कर्णधारपद सांभाळेल. त्याचबरोबर, या सामन्यात रहाणेसह सुरेश रैना आणि युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत यांच्या कामगिरीवर विशेष लक्ष असेल. ब्रेबॉर्न स्टेडियमवर होत असलेल्या हा सामना इंग्लंडविरुध्दच्या आगामी मर्यादित षटकांच्या मालिकेपूर्वीचा अखेरचा सराव सामना असेल. यंदाच्या रणजी मोसमात पंतने चमकदार कामगिरी करताना सर्वांचे लक्ष वेधले आहे. १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत उपविजेत्या ठरलेल्या भारतीय संघाचा तो सदस्य होता, शिवाय धोनीनंतर भारतीय संघाचा भावी यष्टीरक्षक म्हणूनही त्याच्याकडे पाहिले जात असल्याने पंतकडे विशेष लक्ष असेल. झारखंडच्या इशान किशनवरही नजरा असतील. इशानही यष्टीरक्षक-फलंदाज असून, या सामन्यात यष्टीरक्षणाची जबाबदारी त्याच्यावरच असेल.दुसरीकडे अजिंक्य रहाणेची कामगिरी सर्वात महत्त्वाची आहे. इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेदरम्यान झालेल्या दुखापतीनंतर तो पुनरागमन करीत असून, एकदिवसीय मालिकेआधी हा सराव सामना रहाणेसाठी महत्त्वाचा आहे. त्याच वेळी भारतीय टी-२० संघातील स्थान कायम राखलेल्या रैनासाठीही स्वत:ला सिद्ध करण्याची ही नामी संधी असेल. अनुभवी शेल्डॉन जॅक्सन, विजय शंकर, परवेझ रसूल आणि दीप हुड्डा या अष्टपैलू खेळाडूंवरही भारत ‘अ’ संघाच्या फलंदाजीची जबाबदारी असेल, तर अनुभवी वेगवान गोलंदाज विनयकुमार, अशोक दिंडा आणि प्रदीप सांगवान यांच्यावर गोलंदाजीची मदार असेल. शिवाय स्पिनर शाहबाज नदीमदेखील निर्णायक ठरू शकतो. त्याचबरोबर, इंग्लंडदेखील मुख्य अष्टपैलू बेन स्टोक्स, यष्टीरक्षक जॉनी बेयरस्टॉ आणि वेगवान गोलंदाज लियाम प्लंकेट यांना सरावाची संधी देईल. पहिल्या सराव सामन्यात या प्रमुख त्रयीला विश्रांती देण्यात आली होती. (क्रीडा प्रतिनिधी)प्रतिस्पर्धी संघ :भारत ‘अ’ : अजिंक्य रहाणे (कर्णधार), रिषभ पंत, सुरेश रैना, दीपक हुड्डा, इशान किशन, शेल्डॉन जॅक्सन, विजय शंकर, शाहबाज नदीम, परवेझ रसूल, आर. विनयकुमार, प्रदीप सांगवान आणि अशोक दिंडाइंग्लंड इलेव्हन : इआॅन मॉर्गन (कर्णधार), मोईन अली, जॉनी बेयरस्टॉ, जॅक बॉल, सॅम बिलिंग्स, जोस बटलर, लियाम डॉसन, अ‍ॅलेक्स हेल्स, लियाम प्लंकेट, आदिल रशिद, जेसन राय, बेन स्टोक्स, डेव्हीड विली आणि ख्रिस वोक्स.