मालदीवचा सलग दुसरा विजय
By Admin | Updated: December 27, 2015 02:30 IST2015-12-27T02:30:39+5:302015-12-27T02:30:39+5:30
मालदीव ने सॅफ फुटबॉल चषकात बांग्लादेशला ग्रुप बीमध्ये शनिवारी ३-१ असे पराभूत केले. मालदीवचा हा सलग दुसरा विजय आहे.

मालदीवचा सलग दुसरा विजय
तिरुअनंतपुरम : मालदीव ने सॅफ फुटबॉल चषकात बांग्लादेशला ग्रुप बीमध्ये शनिवारी ३-१ असे पराभूत केले. मालदीवचा हा सलग दुसरा विजय आहे.
स्पर्धेत मालदीवचा हा दुसरा विजय तर बांगलादेशचा दुसरा पराभव आहे. या आधी मालदीवने भुतानला पराभूत केले होते. तर बांगलादेशला अफगाणीस्तानकडून ४-० ने पराभव पत्करावा लागला होता.
केरळच्या त्रिवेंद्रम स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात मालदीवच्या खेळाडूंना सुरूवातीपासूनच आपला दबदबा कायम ठेवला. पहिला हाफ संपायच्या दोन मिनिटे आधी मिळालेल्या पेनल्टीचा अली अशफाक याने फायदा घेत गोल केला. आणि मालदीवला १ -० अशी आघाडी मिळाली. बांगलादेशच्या गोलकिपरने हा गोल अडवण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. त्यानंतर ८६ व्या मिनिटाला हेमोंता विन्सेट विश्वासने बांगलादेशसाठी एक गोल करत बरोबरी मिळवून दिली. मात्र अखेरच्या काही क्षणात मालदीवच्या नाएज हसन आणि अहमद नाशिद यांनी गोल करून मालदिवला ३-१ असा विजय मिळवून दिली. हसनने ९० व्या मिनिटात गोल केला.