सर्च टॅलेंट पोर्टल पुढील महिन्यापासून
By Admin | Updated: October 6, 2016 05:01 IST2016-10-06T05:01:28+5:302016-10-06T05:01:53+5:30
देशात ‘टॅलेंट’ची कमतरता नाही; केवळ शोध घेण्याची गरज आहे. हाच उद्देश डोळ्यांसमोर ठेवून केंद्र सरकारने ‘सर्च टॅलेंट पोर्टल’ सुरू करण्याचा निर्णय घेतला.

सर्च टॅलेंट पोर्टल पुढील महिन्यापासून
सचिन कोरडे / पणजी
देशात ‘टॅलेंट’ची कमतरता नाही; केवळ शोध घेण्याची गरज आहे. हाच उद्देश डोळ्यांसमोर ठेवून केंद्र सरकारने ‘सर्च टॅलेंट पोर्टल’ सुरू करण्याचा निर्णय घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतून हे पोर्टल साकारले असून पुढील महिन्यात ते सुरू होईल, असे केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. ‘ब्रिक्स’ या आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेच्या उद्घाटन समारंभासाठी गोयल गोव्यात आले होते, त्या वेळी त्यांनी संवाद साधला.
गोयल म्हणाले, ‘‘देशातील मुलांना ‘खरी संधी’ मिळावी, या उद्देशाने हे ‘पोर्टल’ सुरू करण्याचा निर्णय केंद्रीय क्रीडा विभागाने घेतला आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातील मुलांना आपले कौशल्य सिद्ध करण्याची सुवर्णसंधी मिळेल. त्यांना स्पर्धेतील सहभाग, प्रदर्शन, कौशल्य, मोबाईल, ई-मेल आदी माहितीचा व्हिडीओ या पोर्टलवर अपलोड करावा लागेल. या पोर्टलवर आलेल्या सर्व व्हिडीओंचा क्रीडातज्ज्ञ अभ्यास करतील आणि त्यातून मुलांची निवड केली जाईल. निवडलेल्या मुलांना नजीकच्या साई केंद्राद्वारे मोफत प्रशिक्षण, शिष्यवृत्ती, सुविधा उपल्ध करून दिल्या जातील.’’ गुणवान आणि कौशल्यवान खेळाडूंचा शोध घेण्यास हे पोर्टल अत्यंत महत्त्वाचे ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
पोर्टलसाठी दिग्गजांसोबत बैठक
च्आॅलिम्पिक स्पर्धा आटोपल्यानंतर देशभरातील विविध खेळांतील द्रोणाचार्य पुरस्कारविजेत्या मंडळींना एकत्र आणण्यात आले. गेल्या ५० वर्षांच्या इतिहासात असे घडले नव्हते. प्रत्येकाला त्याचे मत व्यक्त करण्याची संधी मिळाली.
च्पंतप्रधानांनी सर्वांची मते
जाणून घेतली. दीर्घ चर्चेनंतर नरेंद्र मोदी यांनी पोर्टलची कल्पना मांडली. या कल्पनेचे प्रत्येकाने कौतुक केले आणि त्यातून आता पोर्टल सुरू होत आहे, असेही गोयल यांनी सांगितले.