सागरी जलतरणपटू जयंत सन्मानित
By Admin | Updated: April 26, 2016 00:16 IST2016-04-26T00:16:35+5:302016-04-26T00:16:35+5:30
नागपूर : लांब पल्ल्यात सागरी जलतरणात यशस्वी कामगिरी करणारा नागपूरचा युवा जलतरणपटू जयंत जयप्रकाश दुबळे याचा नेहरू क्रीडा मंडळाच्यावतीने रविवारी एका कार्यक्रमात सत्कार करण्यात आला.

सागरी जलतरणपटू जयंत सन्मानित
न गपूर : लांब पल्ल्यात सागरी जलतरणात यशस्वी कामगिरी करणारा नागपूरचा युवा जलतरणपटू जयंत जयप्रकाश दुबळे याचा नेहरू क्रीडा मंडळाच्यावतीने रविवारी एका कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. १३ वर्षांच्या जयंतने मुंबई आणि गोव्याच्या सागरात ११० कि.मी. अंतर २५.५५ तासांत पोहून नवा विक्रम नोंदविला होता. आ. सुधाकर कोहळे यांच्या हस्ते जयंतला गौरविण्यात आले. कोहळे यांनी जयंतच्या कामगिरीचा गौरव करीत जयंतने युवा वयात सागराला गवसणी घालणे हे मोठे कर्तृत्व असल्याचे सांगितले. यावेळी नगरसेविका दिव्या धुरडे, नगरसेवक प्रशांत धवड, नेहरू क्रीडा मंडळाचे सचिव रमण खरे, जयंतचे वडील डॉ. जयप्रकाश दुबळे, जयंतचे कोच डॉ. संभाजी भोसले आदी उपस्थित होते. संदेश खरे यांनी संचालन केले. आभार कडूस्कर यांनी मानले.(क्रीडा प्रतिनिधी)