ड्यूनेडिन : स्कॉटलंड आणि अफगाणिस्तान संघ उद्या गुरुवारी विश्वचषकाच्या ‘अ’ गटात खेळणार असून, दोन्ही संघांना पहिला विजय नोंदविण्याची उत्सुकता आहे. उभय संघांनी मोठ्या संघांना कडवे आव्हान दिले; पण विजयापासून दूर राहिले होते.अफगाणिस्तान संघ लंकेविरुद्ध अपसेट करण्यासमीप पोहोचला होता; पण माहेला जयवर्धनेने अनुभव पणाला लावून त्यांच्या आशांवर पाणी फेरले. स्कॉटलंडनेदेखील सहयजमान न्यूझीलंडला त्रस्त केले होते. विजयासाठी १४३ धावांचे लक्ष्य गाठणाऱ्या न्यूझीलंडला ७ फलंदाज गमवावे लागले. असोसिएट सदस्य असलेले दोन्ही संघ पहिल्या दोन्ही सामन्यांत पराभूत झाल्याने उपांत्यपूर्व फेरी गाठण्याची दूरपर्यंत शक्यता नाही; पण दोन्ही संघांना किमान एक विजय हवा आहे. स्कॉटलंड दोन विश्वचषक खेळला; पण अद्याप त्यांच्या नशिबी विजय आला नाही. दुबईत गेल्या महिन्यात झालेल्या सामन्यात स्कॉटलंडने १५० धावांनी विजय साजरा केला होता. त्या वेळी अफगाण संघ अवघ्या ६३ धावांत गारद झाला होता. मध्यम जलदगती गोलंदाज ज्योश डावे याने सामन्यात २८ धावा देऊन ६ गडी बाद केले होते.(वृत्तसंस्था)
स्कॉटलंड- अफगाणिस्तानची नजर पहिल्या विजयावर
By admin | Updated: February 26, 2015 00:49 IST