शालेय ‘आॅलिम्पिक’ स्पर्धा रंगणार
By Admin | Updated: November 5, 2015 23:32 IST2015-11-05T23:32:46+5:302015-11-05T23:32:46+5:30
कोणत्याही खेळाडूच्या यशस्वी कारकिर्दीचा शालेय स्पर्धा पाया असतो. या स्पर्धांमधूनच प्रत्येक खेळाडू घडत जातो. त्यामुळेच प्रत्येक शालेय खेळाडूला उच्चस्तरीय स्पर्धांद्वारे स्वत:ला

शालेय ‘आॅलिम्पिक’ स्पर्धा रंगणार
मुंबई : कोणत्याही खेळाडूच्या यशस्वी कारकिर्दीचा शालेय स्पर्धा पाया असतो. या स्पर्धांमधूनच प्रत्येक खेळाडू घडत जातो. त्यामुळेच प्रत्येक शालेय खेळाडूला उच्चस्तरीय स्पर्धांद्वारे स्वत:ला आजमवण्याची संधी मिळावी, यासाठी डॉ. डीवाय स्पोटर््स अॅकॅडमी आणि स्पोटर््स फॉर आॅल यांच्या संयुक्त विद्यमानाने आगामी डिसेंबर महिन्यात आंतर शालेय क्रीडा स्पर्धेचा धमाका आयोजित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, ‘अब जितेगा इंडिया’ असे म्हणत टीम इंडियाचा आक्रमक फलंदाज रोहित शर्माची मदत या उपक्रमाला मिळणार आहे.
एकूण नऊ खेळांचे सामने या स्पर्धेत होणार असून, यामध्ये स्क्वॉश, टेबल टेनिस, व्हॉलिबॉल, बास्केटबॉल, टेनिस, स्विमिंग, बॅडमिंटन, हँडबॉल आणि ज्युडो या खेळांचा समावेश आहे. विशेष म्हणजे विविध वयोगटात रंगणाऱ्या या स्पर्धेत कोणत्याही शाळेचे विद्यार्थी सहभाग घेऊ शकतात. त्यामुळे ही स्पर्धा प्रत्येक शालेय खेळाडूसाठी सुवर्णसंधी असेल.
नेरुळ येथील डॉ. डीवाय स्पोटर््स अॅकेडमीमध्ये २४ ते ३१ डिसेंबर दरम्यान पार पडणाऱ्या या स्पर्धेसाठी आतापर्यंत ५० हून अधिक शाळांनी आपला सहभाग निश्चित केला आहे. दखल घेण्याची बाब म्हणजे, या स्पर्धेचे शुल्क भरणे कोणत्या शाळेसाठी शक्य नसेल, तर त्या शाळेचे पूर्ण शुल्क रोहित शर्मा स्वत: भरणार आहे.
स्पर्धेत सहभाग निश्चित करण्याची शेवटची तारीख १५ नोव्हेंबर आहे. या स्पर्धेत प्रत्येक सामन्याचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करून ते खेळाडूंना किंवा त्यांच्या संघांना देण्यात येणार आहे, तसेच आठ दिवसांच्या या आंतर शालेय क्रीडा स्पर्धेदरम्यान क्रीडा प्रशिक्षक व शालेय क्रीडा शिक्षक यांच्यासाठी विशेष शिबिराचेही आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.