शाळा वार्ता: गुरुनानक विद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिवस
By Admin | Updated: August 29, 2014 23:33 IST2014-08-29T23:33:08+5:302014-08-29T23:33:08+5:30
अकोला : गुरुनानक विद्यालय येथे मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिवसानिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला. सिंध शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष रामचंद्र मनवाणी व परमानंद चावला यांच्या हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

शाळा वार्ता: गुरुनानक विद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिवस
अ ोला : गुरुनानक विद्यालय येथे मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिवसानिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला. सिंध शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष रामचंद्र मनवाणी व परमानंद चावला यांच्या हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शुक्रवार, २९ ऑगस्ट रोजी झालेल्या या कार्यक्रमात शाळेतील उत्कृष्ट खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. यानिमित्त विविध खेळ स्पर्धांचे आयोजन केले होते. स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व शिल्ड प्रदान करण्यात आले. याप्रसंगी गणेश चतुर्थी उत्सव साजरा करण्यात आला. मान्यवरांनी गणेश चतुर्थीचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. क्रीडा शिक्षक संतोष पंजवाणी, पर्यवेक्षक एम.डी. केसवाणी, किडीले, दहलानी यांच्या मार्गदर्शनात विविध खेळ व सांस्कृतिक स्पर्धा घेण्यात आल्या. कार्यक्रमाचे संचालन छाया आहुजा यांनी केले. आभार भावना माखिजा यांनी मानले. (क्रीडा प्रतिनिधी)फोटो: क्रीडा दिनानिमित्त गुरुनानक विद्यालयात खेळाडूंचा सत्कार करण्यात आल. -३०सीटीसीएल७३...