शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

"माझ्या पतीला पुरूषांमध्ये इंटरेस्ट..."; वर्ल्ड चॅम्पियन स्वीटी बूराचा खळबळजनक आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 15:00 IST

स्वीटी आणि दीपक यांच्यातील वादाच्या पार्श्वभूमीवर १५ मार्चला हिसार पोलीस ठाण्यात दीपकला बोलवण्यात आले होते. 

हिसार - माझ्या पतीला पुरूष आवडतात असा खळबळजनक आरोप आंतरराष्ट्रीय बॉक्सर स्वीटी बूरा हिने तिचा पती कबड्डी प्लेयर दीपक हुड्डावर केला आहे. हरियाणातील या खेळाडू जोडप्यातील घरगुती वाद गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत आहेत. आता हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहचले आहे. त्यात सोशल मीडियावर दीपक हुड्डा आणि स्वीटी बूरा यांच्यातील वादाशी संबंधित व्हिडिओ व्हायरल होत आहेत. अलीकडेच स्वीटी आणि दीपक यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला होता.

स्वीटी बूराने भारतीय कबड्डी टीमचा माजी कॅप्टन दीपक हुड्डावर मारहाणीचा आरोप लावला होता. त्याशिवाय पतीने १ कोटी आणि फॉर्च्यूनरची मागणी केल्याचा दावा केला होता. तर दीपकनेही स्वीटी बूराविरोधात हिसार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यात स्वीटी आणि तिच्या मामावर मारहाणीचा आरोप केला होता. त्यावेळी दोन्हीकडील लोकांनी फसवणूक, मारहाण, हुंड्यासाठी छळ या प्रकरणी चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावले होते. 

स्वीटी आणि दीपक यांच्यातील वादाच्या पार्श्वभूमीवर १५ मार्चला हिसार पोलीस ठाण्यात दीपकला बोलवण्यात आले होते. त्यावेळी स्वीटी बूरा आणि तिच्या नातेवाईकांनाही बोलावले. याबाबत चौकशी सुरू होती त्याचवेळी स्वीटी आणि दीपक यांच्यात वादावादी झाली आणि दोघे झटापटीवर उतरले. आता पुन्हा एकदा स्वीटी बूराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून व्हिडिओ पोस्ट करत पती दीपक हुड्डावर गंभीर आरोप लावले आहेत. व्हायरल व्हिडिओ अर्धवट असून पोलीस ठाण्यात अन्य काही गोष्टी झाल्या त्या व्हिडिओत दाखवल्या नसल्याचं स्वीटी बूराने म्हटलं.

माझ्या पतीला पुरूषांमध्ये इंटरेस्ट...

या प्रकरणात स्वीटी बूराने नवा दावा केला आहे. माझ्या पतीला पुरूषांमध्ये इंटरेस्ट आहे, हे मला लग्नानंतर कळलं. माझ्याकडे त्याचे पुरावे आहेत. जे मी कोर्टात सादर करेन. हिसार पोलीस आणि दीपक हुड्डा मिळून माझ्याविरोधात षडयंत्र रचत आहेत. मला पोलीस ठाण्यात बोलावून उकसवायचे, दीपक हुड्डा माझ्या चारित्र्यावर खूप घाण घाण बोलत होता. अर्धा तास हे सर्व सुरू होते परंतु व्हिडिओत ते काही रेकॉर्ड नाही. हिसारचे एसपी आणि दीपक हुड्डाने हे प्लॅनिंगनुसार केले असं तिने म्हटलं.

दरम्यान, जर मी इतकी वाईट आहे तर मला घटस्फोट का देत नाही. मला घटस्फोट हवाय, तो मला द्या बाकी मला काही नको, मी त्याला काही मागतही नाही असंही स्वीटी बूराने सांगितले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी