महिला बॉक्सरनं कांस्य पदक जिंकलं आणि म्हटलं "मोदीजी आता शेतकऱ्यांच्या मागण्यांचा विचार करा"

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2021 12:03 PM2021-05-30T12:03:56+5:302021-05-30T12:05:08+5:30

संयुक्त अरब अमिरातमध्ये (यूएई) सुरू असलेल्या आशियाई चॅम्पियनशीप बॉक्सिंग स्पर्धेत हरियाणाच्या स्वीटी बूरा (Saweety Boora) हिनं कांस्य पदक पटकावलं आहे.

Saweety Boora boxer won a bronze medal and appeal pm nadendra modi consider the demands of the farmers | महिला बॉक्सरनं कांस्य पदक जिंकलं आणि म्हटलं "मोदीजी आता शेतकऱ्यांच्या मागण्यांचा विचार करा"

महिला बॉक्सरनं कांस्य पदक जिंकलं आणि म्हटलं "मोदीजी आता शेतकऱ्यांच्या मागण्यांचा विचार करा"

googlenewsNext

संयुक्त अरब अमिरातमध्ये (यूएई) सुरू असलेल्या आशियाई चॅम्पियनशीप बॉक्सिंग स्पर्धेत हरियाणाच्या स्वीटी बूरा (Saweety Boora) हिनं कांस्य पदक पटकावलं आहे. विशेष म्हणजे स्वीटीनं हे पदक शेतकरी आंदोलनात हुतात्मा झालेल्या शेतकऱ्यांना समर्पित केले आहे. त्याचबरोबर कोरोना महामारीच्या काळातही गेल्या सहा महिन्यांपासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मागणीचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (PM Narendra Modi) विचार करावा असं आवाहन तिनं केले आहे.

स्वीटीने याबाबत एक ट्विट करुन पंतप्रधान नरेंद्र मोदींना आवाहन केलं आहे. "दुबईमध्ये २१ मे पासून सुरु असलेल्या आशियाई चॅम्पियनशिपमध्ये मला कांस्य पदक मिळालं आहे. मी हे पदक शेतकरी आंदोलनात शहीद झालेल्या शेतकऱ्यांना समर्पित करते. त्याचबरोबर मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आवाहन करत आहे की,  गेले अनेक दिवस आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचं ऐकावं आणि त्यावर विचार करावा", असं स्वीटीनं म्हटलं आहे. 
स्वीटी बूरा ही हरियाणातील हिसार गावातील बॉक्सर आहे. तिचे वडिल महेंद्रसिंह हे शेतकरी आहेत. त्याचबरोबर ते राष्ट्रीय बास्केटबॉल देखील खेळले आहेत. स्वीटीने २०१४ पासून आंतरराष्ट्रीय स्तरावर पदकं जिंकली आहेत. भारताच्या प्रमुख महिला बॉक्सरमध्ये तिचा समावेश होतो.
 

Web Title: Saweety Boora boxer won a bronze medal and appeal pm nadendra modi consider the demands of the farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.