शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

एक राज्य एक संघटना, मुंबई हॉकीला वाचवा! माजी हॉकीपटूंचे क्रीडामंत्र्यांना पत्र 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2020 07:04 IST

याबाबत ‘एमएचएएल’चे सचिव रामसिंग राठोड यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, ‘संघटनेत कायद्यानुसार काम करावे लागते. आम्ही हॉकी महाराष्ट्राची मान्यता घेतली नसती, तर आज मुंबई हॉकी कुठेच दिसली नसती

मुंबई : दिग्गज ऑलिम्पियन हॉकीपटू एम. एम. सोमय्या, जोकिम कार्व्हालो आणि धनराज पिल्ले यांसारख्या अनेक माजी खेळाडूंनी मुंबई हॉकीला वाचविण्यासाठी केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजीजू यांच्याकडे अपील केले आहे. मुंबई संघाला आता राष्ट्रीय स्पर्धेत स्वतंत्रपणे सहभागी होता येणार नसल्याने माजी खेळाडूंनी आवाज उठविला आहे.

‘एक राज्य एक संघटना’ या नियमानुसार हॉकी इंडियाने मुंबई हॉकी संघटनेची (एमएचएएल) मान्यता रद्द करताना राज्यातील एकमेव संघटना म्हणून ‘हॉकी महाराष्ट्र’ला मान्यता दिली आहे. विशेष म्हणजे एमएचएएलनेही याविरुद्ध कोणताही आक्षेप न घेता हॉकी महाराष्ट्रला पाठिंबा दर्शविला आहे. जानेवारीमध्ये हॉकी इंडियाने जाहीर केलेला हा निर्णय एक जुलैपासून लागू होईल.

यामुळेच, धनराज पिल्ले, एम. एम. सोमय्या, जोकिम कार्व्हालो, मेर्विन फर्नांडिस, मार्सेलस गोम्स, बलबीरसिंग ग्रेवाल, गुरबक्षसिंग ग्रेवाल, विरेन रस्किन्हा, इक्बालजित सिंग, एलिझा नेल्सन, सेल्मा डीसिल्व्हा आणि मार्गारेट टोस्कानो या माजी आंतररष्ट्रीय हॉकीपटूंनी मुंबई हॉकी वाचविण्यासाठी क्रीडामंत्र्यांसह भारतीय आॅलिम्पिक संघटना प्रमुख (आयओए) नरिंदर बत्रा, सचिव राजीव मेहता आणि हॉकी इंडियाचे अध्यक्ष मुश्ताक अहमद यांच्याकडे ईमेलद्वारे अपील केले आहे. माजी खेळाडूंनी ईमेलमध्य म्हटले आहे की, ‘राष्ट्रीय स्पर्धेत मुंबईच्या संघाला स्वतंत्रपणे सहभागी होण्यापासून रोखण्यात आले, तर मोठे नुकसान होईल. यामुळे भारतीय हॉकी गुणवत्ता कमजोर होईल. यामुळे मुंबईतील खूप कमी खेळाडूंना महाराष्ट्राचे प्रतिनिधित्त्व करण्याची संधी मिळेल.’

याबाबत ‘एमएचएएल’चे सचिव रामसिंग राठोड यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, ‘संघटनेत कायद्यानुसार काम करावे लागते. आम्ही हॉकी महाराष्ट्राची मान्यता घेतली नसती, तर आज मुंबई हॉकी कुठेच दिसली नसती. यामध्ये सर्व सदस्य, खेळाडू, पंच, अधिकारी यांचे नुकसान झाले असते. त्यामुळे खेळाडूंचे हित आणि त्यांचे मत जाणून आम्ही हा निर्णय घेतला आहे. मुंबईतील सर्व स्पर्धा महाराष्ट्र संघटनेच्या मान्यतेने खेळविण्यात येतील. त्यामुळे खेळाडूंचे कोणतेही नुकसान होणार नाही.’‘आधी हॉकी इंडिया आता हॉकी महाराष्ट्र’जानेवारीत हॉकी इंडियाचे पत्र मिळाल्यानंतर आम्ही बैठक घेऊन कोणतीही कायदेशीर कारवाई न करण्याचा निर्णय घेतला. जर आम्ही हा निर्णय मान्य केला नसता, तर एमएचएएलचे अस्तित्व संपुष्टात आले असते. त्यामुळे आमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. अनेकांना असे वाटते की, एमएचएएलने एक पाऊल मागे घेतले आहे, पण तसे नाहीये. आता एकच फरक पडेल की, आधी हॉकी इंडियाला रिपोर्ट करावे लागायचे, ते आता हॉकी महाराष्ट्राला करावे लागेल. राष्ट्रीय स्तरावर खेळाडूंना आता थोड्या प्रमाणात अधिक संघर्ष करावा लागेल हे नक्की. - मंघासिंग बक्षी, अध्यक्ष, एमएचएएल

टॅग्स :Hockeyहॉकी