उपविजेतेपदावरच सौरभचे समाधान
By Admin | Updated: November 8, 2016 03:34 IST2016-11-08T03:34:43+5:302016-11-08T03:34:43+5:30
स्पर्धेत जायंट किलर ठरलेल्या भारताच्या सौरभ वर्माला बिटबर्गर बॅडमिंटन स्पर्धेत अखेर उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले

उपविजेतेपदावरच सौरभचे समाधान
सारब्रकेन : स्पर्धेत जायंट किलर ठरलेल्या भारताच्या सौरभ वर्माला बिटबर्गर बॅडमिंटन स्पर्धेत अखेर उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. चीनच्या चौथ्या मानांकित शी यूकीविरुद्ध झालेल्या अटीतटीच्या लढतीत वर्माला १९-२१, २०-२२ असा पराभव पत्करावा लागला.
४५ मिनिटांपर्यंत रंगलेल्या या चुरशीच्या सामन्यात वर्माने यूकीला चांगलेच झुंजविले. विशेष म्हणजे यूकीने सौरभला यावर्षी लखनऊ येथे झालेल्या सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय स्पर्धेतही नमविले होते. जागतिक क्रमवारीत १६व्या स्थानी असलेल्या यूकीने पहिल्या गेममध्ये १६-१८ अशा पिछाडीवर असताना सलग चार गुणांची कमाई करुन २०-१८ अशी आघाडी घेतली. यानंतर त्याने मोक्याच्यावेळी खेळ उंचावताना पहिला गेम २१-१९ असा जिंकून सामन्यात आघाडी घेतली.