ताईपै सिटी : भारताच्या सौरभ वर्माने सर्वोत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून स्थानिक खेळाडू अग्र्रमानांकित सू जेन हाओला पराभवाचा धक्का देत ताईपै ग्रांप्री बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. बेल्जियम आणि पोलंड येथील स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश केलेल्या सौरभने या स्पर्धेचा प्रबळ दावेदार असलेल्या हाओला ३३ मिनिटांत ११-४, ११-७, ११-९ गेममध्ये पराभूत करून खळबळ उडवून दिली. मध्य प्रदेशच्या २३ वर्षीय सौरभला पहिल्या गेममध्ये हाओकडून थोडेसुद्धा आव्हान मिळाले नाही. दुसऱ्या व तिसऱ्या गेममध्ये हाओने काही चांगले शॉट मारून आपले अस्तित्व सिद्ध केले. पण सौरभने त्याची डाळ शिजू दिली नाही. दुखापतीनंतर पुनरागमन करणाऱ्या सौरभला अंतिम फेरीत मलेशियाच्या डेरेन ल्यू आणि पाचवा मानांकित चिनी तैपेईच्या लिन यू सिएन यांच्यातील विजेत्याविरुद्ध लढावे लागणार आहे. (वृत्तसंस्था)
सौरभ वर्मा अंतिम फेरीत
By admin | Updated: October 16, 2016 02:47 IST