शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सात्त्विक-चिराग जोडीला चीन मास्टर्समध्ये उपविजेतेपद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2023 10:18 IST

शेनझेन : भारताचे स्टार बॅडमिंटनपटू सात्त्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीला रविवारी चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष ...

शेनझेन : भारताचे स्टार बॅडमिंटनपटू सात्त्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीला रविवारी चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. अंतिम लढतीत त्यांना चीनच्या लियांग वेई केंग आणि वांग चांग जोडीविरुद्ध पराभव पत्करावा लागला. भारताच्या जोडीने पहिला गेम १९-२१ असा गमावला. त्यानंतर शानदार रॅली करताना त्यांनी दुसरा गेम २१-१८ असा जिंकत लढतीत पुनरागमन केले.

निर्णायक गेममध्ये १-८ अशा पिछाडीवरून त्यांनी पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. पण तिसरा गेम १९-२१ असा गमावल्याने भारताच्या जोडीला एक तास ११ मिनिटे रंगलेल्या लढतीत पराभव पत्करावा लागला. ही जोडी दुसऱ्या बीडब्ल्यूएफ सुपर ७५० विजेतेपदापासून अवघ्या एका विजयाच्या अंतरावर होती. पण लियांग वेई केंग आणि वांग या जगातील अव्वल जोडीने त्यांचे स्वप्न उद्ध्वस्त केले. हांगझोऊ आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या भारतीय जोडीने दुसऱ्या गेममध्ये पुनरागमन करत सामना निर्णायक गेमपर्यंत नेला. चीनच्या जोडीने संयम राखताना विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. 

या विजयासह लियांग आणि वांग जोडीने आशियाई स्पर्धेत भारतीय जोडीकडून मिळालेल्या पराभवाचा हिशेब चुकता केला.  सात्त्विक-चिरागसाठी हे वर्ष शानदार ठरले. त्यांनी यावर्षी आशियाई बॅडमिंटन स्पर्धा, इंडोनेशिया सुपर १०००, कोरिया सुपर ५००, स्वीस सुपर ३०० आणि आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे.   

बचाव ठरला कमकुवतचढउतार असलेल्या अंतिम लढतीत भारतीय जोडी सर्वोत्तम कामगिरी करू शकली नाही. दबावात त्यांचा बचाव कमकुवत ठरला. सात्त्विक बचाव करण्यात अपयशी ठरला तर वांगने संधींचा लाभ घेत गुण मिळविले. अंतिम लढतीत दोन्ही जोड्यांचा कस लागला. लियांग आणि वांग यांना अंतिम फेरीच्या आधी भारतीय जोडीविरुद्ध विजयी कामगिरी बरोबरीची होती. त्यात सात्विक आणि चिरागने अधिकाधिक सामने सरळ गेममध्ये जिंकले आहेत.

टॅग्स :BadmintonBadminton