शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

EXCLUSIVE : आई ग्रामसेवक अन् वडील शिक्षक! अशी घडली वर्ल्ड चॅम्पियन 'अदिती', वाचा सविस्तर

By ओमकार संकपाळ | Updated: August 5, 2023 23:14 IST

World Archery Championships : अदिती स्वामी हिने जागतिक तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारताला सुवर्णपदक जिंकून दिले.

मुंबई : 'अगर किसी चीज को शिद्दत से चाहो तो पूरी कायनात तुम्हे उससे मिलाने में लग जाती है', या डायलॉगप्रमाणे सातारच्या अदिती स्वामीने जागतिक पातळीवर घवघवीत यश मिळवले. अदिती स्वामी हिने जागतिक तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारताला सुवर्णपदक जिंकून दिले. या डोंगराएवढ्या यशानंतर अदितीने 'लोकमत'शी संवाद साधताना विविध मुद्द्यांवर भाष्य केले. लेखाच्या सुरूवातीला ज्याचा उल्लेख केला तो डायलॉग सांगून अदितीने आपल्या यशाचा मंत्र सोप्या शब्दांत सांगितला. वयाच्या नवव्या वर्षापासून सुरू केलेला संघर्ष आज फळ देत असल्याची भावना अदितीची आहे. 

१७ वर्षीय अदिती गोपीचंद स्वामी ही भारताची पहिली विश्वविजेती ठरली. तिने महिलांच्या जागतिक तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण कामगिरी करून तिरंग्याची शान वाढवली. शुक्रवारी सांघिक आणि शनिवारी वैयक्तिक सुवर्ण जिंकून अदितीने तमाम भारतीयांच्या मनात जागा केली. अदिती ही मूळची सातारची असून तिची आई आंबवडी या गावात ग्रामसेवक म्हणून कार्यरत आहे, तर वडील पेशाने शिक्षक आहेत. तिला एक लहान भाऊ असून तो देखील आर्चरीमध्ये नशीब आजमावत आहे. 

अदितीचं घवघवीत यश 'लोकमत'शी संवाद साधताना अदितीने म्हटले, "मी सातारची असून शेरेवाडी माझे मूळ गाव आहे. २०१६ मध्ये प्रविण सरांकडे याचे प्रशिक्षण घेतले अन् तेव्हापासून माझ्या या कारकिर्दीची सुरूवात झाली. शुक्रवारी सांघिक खेळी करताना समोर कोण आहे याची पर्वा न करता सामना केला. तर, शनिवारी देखील माझ्या खेळावर लक्ष केंद्रीत केल्याने मला हे यश मिळाले."

ऐतिहासिक कामगिरी केल्यानंतर बोलताना अदितीने म्हटले, "माझ्या आतापर्यंतच्या सर्व प्रयत्नांना आज फळ मिळाले आहे. मी व्यासपीठावर ५२ सेकंदांचे राष्ट्रगीत वाजण्याची वाट पाहत होते... ही फक्त सुरुवात आहे, मला भारतासाठी पुढील आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकायचे आहे". ऐतिहासिक विजयानंतर अदिती भारावून गेल्याचे पाहायला मिळाले. 

सातारच्या लेकीची सोनेरी कामगिरी अदितीचे वडील पेशाने शिक्षक आहेत, तर आई आंबवडी या गावची ग्रामसेवक आहे. मध्यमवर्गीय कुटुंबातील तरूणीचं हे यश अनेकांसाठी प्रेरणा आहे. तिचा भाऊ देखील बहिणीच्या पावलावर पाऊल टाकत तिरंदाजीचा सराव करत आहे. २०१६ मध्ये अर्थात ९ वर्षांची असताना अदितीने या क्षेत्रात पाऊल ठेवले अन् २०१९ पासून महाराष्ट्रासाठी पदक जिंकले. राज्यस्तरावर चमकल्यानंतर २०२१ पासून अदिती आजतागायत भारतासाठी पदकांची कमाई करत आहे. 

टॅग्स :Gold medalसुवर्ण पदकInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टीsatara-acसाताराWomenमहिलाIndiaभारत