साताराचा विजयी स्मॅश
By Admin | Updated: June 7, 2015 00:45 IST2015-06-07T00:45:22+5:302015-06-07T00:45:22+5:30
भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या पश्चिम विभागीय ३१ व्या व्हॉलीबॉल स्पर्धेत सातारा संघाने विजेतेपद पटकावले. विद्यापीठ परिसरातील ‘साई’च्या

साताराचा विजयी स्मॅश
औरंगाबाद : भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या पश्चिम विभागीय ३१ व्या व्हॉलीबॉल स्पर्धेत सातारा संघाने विजेतेपद पटकावले. विद्यापीठ परिसरातील ‘साई’च्या पश्चिम विभागीय केंद्रात झालेल्या अंतिम सामन्यात साताराने नांदेडवर मात केली. गतविजेत्या साताराने अंतिम सामन्यात आपले पूर्ण वर्चस्व राखताना नांदेडवर २५-१२, २५-१८ अशा गुणांनी मात करताना विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. साताराने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेताना नांडेडला सामन्यात पुनरागमनाची एकही संधी दिली नाही. सामन्यातील दुसऱ्या सेटमध्ये नांदेडने थोडाफार प्रतिकार केला खरा, मात्र सातारकरांच्या दणक्यापुढे त्यांना निभाव लागला नाही. तत्पूर्वी झालेल्या उपांत्य सामन्यात बलाढ्य सातारा संघाने चमकदार खेळाच्या जोरावर लक्ष वेधणाऱ्या नागपूरचा २५-१९, २५-१६, २५-१४, असा तीन सेटमध्ये झुंजार पराभव केला.