शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

वर्ल्ड चॅम्पियन अदितीचा आशियाई स्पर्धेत सुवर्ण जिंकण्याचा निर्धार; राष्ट्रगीतावेळी झाली भावूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2023 19:12 IST

सातारच्या शिरपेचातही मानाचा तुरा

दीपक देशमुख

सातारा : बर्लिन (जर्मनी) येथे झालेल्या जागतिक खुल्या गटातील तिरंदाजी स्पर्धेत सातारची सुकन्या अदिती स्वामीने पुन्हा सुवर्णवेध साधला आहे. सांघिक प्रकारात आदिती स्वामी, ज्योती सुरेखा आणि परनीत कौर यांच्या संघाने मेक्सिकोला हरवत भारताला विजेतेपद मिळवून दिले तर वैयक्तिक गटातही आदितीने सुवर्णपदक पटकावले. यामुळे सातारच्या शिरपेचातही मानाचा तुरा रोवला आहे.

बर्लिन येथील खुल्या गटातील जागतिक तिरंदाजी स्पर्धांत भारतीय महिला संघाने चमकदार कामगिरी केली आहे. उपांत्य सामन्यात भारतीय महिला संघाने कोलंबिया संघावर २२०-२१६ ने विजय मिळवत अंतिम सामन्यात धडक मारली. यानंतर अंतिम सामन्यात तुल्यबळ मेक्सिको संघाशी लढत होती. भारताच्या अदिती स्वामी, ज्योती सुरेखा आणि परनीत कौर यांनी उत्कृष्ठ खेळाचे प्रदर्शन करत २३५-२२९ ने मेक्सिकोचा पराभव केला व विश्व अजिंक्यपद पटकावले. स्पर्धेत एकूण ६४ देशांतील खेळाडू सहभागी झाले होते.

वैयक्तिक गटातही सुवर्णपदक 

अदिती स्वामी हिने वैयक्तिक गटातही चमकदार कामगिरी केली. अत्यंत चुरशीने झालेल्या अंतिम सामन्यात मेक्सिकोच्याच ॲन्द्रिया बेसेरा हिचा १४९-१४७ पराभव करत सुवर्णपदक पटकावले आहे.

दरम्यान, भारतीय संघाच्या यशाबद्दल पंतप्रधान यांनीही ट्विट करून खेळाडूंचे अभिनंदन केले आहे. आमच्या कम्पाउंड महिला संघाने बर्लिन येथे झालेल्या जागतिक तिरंदाजी स्पर्धेत भारतासाठी पहिले सुवर्णपदक जिंकले असून हा भारतासाठी अभिमानाचा क्षण आहे. त्यांचे कठोर परिश्रम आणि समर्पण यामुळे हे अभूतपूर्व यश मिळाले आहे, शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी कौतुक केले आहे.

सुवर्णपदक पटकाविताच अदितीने माझ्या आतापर्यंतच्या सर्व प्रयत्नांना आज फळ मिळाले आहे. मी व्यासपीठावर राष्ट्रगीत वाजण्याची वाट पाहत होते. ही फक्त सुरुवात आहे, मला भारतासाठी पुढील आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकायचे असल्याचा निर्धार केला.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरTeam Indiaभारतीय क्रिकेट संघ