सरिताचा कांस्य स्वीकारण्यास नकार

By Admin | Updated: October 2, 2014 02:09 IST2014-10-02T02:09:14+5:302014-10-02T02:09:14+5:30

भारतीय महिला बॉक्सर एल. सरितादेवी हिने बुधवारी अधिकारी आणि प्रेक्षक यांना आश्चर्याचा धक्का देत एशियाडचे कांस्यपदक स्वीकारण्यास नकार दिला.

Sarita's bronze refused to accept | सरिताचा कांस्य स्वीकारण्यास नकार

सरिताचा कांस्य स्वीकारण्यास नकार

इंचियोन : सेमीफायनलच्या वादग्रस्त लढतीत रेफ्रीच्या चुकीमुळे पराभूत झालेली भारतीय महिला बॉक्सर एल. सरितादेवी हिने बुधवारी अधिकारी आणि प्रेक्षक यांना आश्चर्याचा धक्का देत एशियाडचे कांस्यपदक स्वीकारण्यास नकार दिला. हे पदक आयोजकांकडे सुरक्षित आहे.
6क् किलो (लाईटवेट) गटात काल सरिताला यजमान देशाची बॉक्सर जिना पार्कविरुद्ध रेफ्रीच्या चुकीच्या निर्णयाचा फटका बसला. पार्कने नंतर रौप्य जिंकले. उभय बॉक्सरमध्ये सरिता फारच सुरेख खेळली; पण जजच्या निर्णयानुसार ती पराभूत ठरली. भारताने जजच्या निर्णयाविरुद्ध अपीलही केले; पण ते फेटाळण्यात आले. सरिता आज पदक वितरण कार्यक्रमात डोळ्यांत आसवे घेऊनच आली होती. पोडियमवर उभ्या असलेल्या सरिताने आधी पदक स्वीकारण्यास नकार दिला. नंतर तिने पार्कची गळाभेट घेतली व स्वत:चे पदक तिच्याकडे सोपविले. माजी आशियाई आणि विश्व चॅम्पियन असलेली सरिता यानंतर समारंभातून निघून गेली. या नाटय़मय घटनाक्रमामुळे चकित झालेल्या पार्कने हे पदक पोडियमवर सोडले आणि काढता पाय घेतला. काल झालेल्या लढतीदरम्यान सरिता विजेती असल्याचे स्पष्ट दिसत होते. तिच्या वर्चस्वाचे चित्र असे होते, की पार्क बचावाच्या मूडमध्ये होती; पण निकाल येताच भारतीय प्रेक्षक अवाक झाले. (वृत्तसंस्था)
 
सरितादेवीविरुद्ध होणार कारवाई 
कांस्यपदक स्वीकारण्यास नकार दिलेल्या सरितादेवीविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करणार असल्याचे आंतरराष्ट्रीय अमॅच्युअर मुष्टियुद्ध संघटनेचे (आईबा) सुपरवायझर डेव्हिड फ्रान्सीस यांनी या संदर्भात अांतरराष्ट्रीय ऑलंपिक महासंघाकडे कळविले आहे. त्यांनी असे सुद्धा म्हटले आहे की, हा सर्व घटनाक्रम सरीता व तिच्या संघाप्रमाणो सुनियोजीत आहे. एक मुष्टियुद्धने पदक ग्रहण करण्यास नकार देणो हे खेद जनक आहे. 
 
करिअर सुरू ठेवण्यासाठी हे आवश्यक होते
मी पदक घेऊ इच्छित नव्हते, असे नाही. मी ते घेतले व नंतर कोरियाच्या खेळाडूला परत केले. करिअर पुढे सुरू ठेवण्यासाठी हे आवश्यक होते; अन्यथा हा कटू अनुभव नेहमीसाठी डोक्यात फिरत राहिला असता. आता परत गेल्यावर माङया चिमुकल्याला कवटाळणार आहे. मी जे केले, त्याचा परिणामही भोगण्यास सज्ज आहे. पण, संपूर्ण प्रकरणात भारतीय अधिका:यांची साथ लाभली नाही, याचे वाईट वाटते. कुणीही भारतीय अधिकारी माङयाकडे फिरकला नाही किंवा कुणी साधे सांत्वन केले नाही. कुणी माङयाशी बोललेदेखील नाही.
- एल. सरितादेवी, बॉक्सर

 

Web Title: Sarita's bronze refused to accept

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.