सरिता सिंहचा नवीन राष्ट्रीय विक्रम

By Admin | Updated: June 2, 2017 00:50 IST2017-06-02T00:50:21+5:302017-06-02T00:50:21+5:30

येथे गुरुवारपासून सुरू झालेल्या २१ व्या फेडरेशन चषक वरिष्ठ राष्ट्रीय मैदानी अजिंक्यपद स्पर्धेत उत्तर प्रदेशच्या सरिता सिंहने

Sarita Singh's new national record | सरिता सिंहचा नवीन राष्ट्रीय विक्रम

सरिता सिंहचा नवीन राष्ट्रीय विक्रम

पतियाळा : येथे गुरुवारपासून सुरू झालेल्या २१ व्या फेडरेशन चषक वरिष्ठ राष्ट्रीय मैदानी अजिंक्यपद स्पर्धेत उत्तर प्रदेशच्या सरिता सिंहने हातोडाफेक प्रकारात ६५.२५ मीटरची कामगिरी करून नवीन राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित करून सुवर्णपदक जिंकले. पूर्वीचा विक्रम २०१४ मध्ये मंजू बालाने ६२.७५ मीटरची कामगिरी करून नोंदविलेला होता. सरिता सिंह नंतर गुंजन सिंहने ६१. ९५ मी. व निधि कुमारने ५७. ९९ मी. हातोडा फेकून अनुक्रमे रौप्य व कास्यपदक जिंकले. महिलांच्या ४०० मी. अडथळ्याच्या (५७.३९ से.) शर्यतीत केरळच्या आर. अनुने सुवर्ण जिंकून नवा विक्रम नोंदविला. (वृत्तसंस्था)

Web Title: Sarita Singh's new national record

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.