सरदार सिंह कर्णधारपदी कायम

By Admin | Updated: July 4, 2014 04:52 IST2014-07-04T04:52:54+5:302014-07-04T04:52:54+5:30

स्कॉटलंडमधील ग्लास्गो येथे २३ जुलैपासून होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेसाठी हॉकी इंडियाने १६ सदस्यीय संघ जाहीर केला आहे़

Sardar Singh retired as captain | सरदार सिंह कर्णधारपदी कायम

सरदार सिंह कर्णधारपदी कायम

नवी दिल्ली : स्कॉटलंडमधील ग्लास्गो येथे २३ जुलैपासून होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेसाठी हॉकी इंडियाने १६ सदस्यीय संघ जाहीर केला आहे़ संघाच्या कर्णधारपदी सरदार सिंह याला कायम ठेवण्यात आले आहे़ उपकर्णधारपदाची धुरा पी़आऱ श्रीजेश याच्याकडे सोपविण्यात आली आहे़
३ आॅगस्टपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेसाठी भारतीय निवडकर्त्यांनी संघ जाहीर केला आहे़ हॉकी इंडियाच्या निवडकर्त्यांमध्ये बी़पी़ गोाविंदा, हरबिंदर सिंह, आऱपी़ सिंह, अर्जुन हलप्पा, हाय परफॉर्मेन्स निदेशक रौलेद ओल्टमेस यांच्यासह मुख्य प्रशिक्षक टेरी वॉल्श यांचा समावेश होता़
राष्ट्रकुल स्पर्धेसाठी संघ निवडण्यासाठी हॉकी इंडियाने ३० जून ते १ जुलैदरम्यान मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियमवर शिबिराचे आयोजन केले होते़ त्यानंतर संघाची घोषणा करण्यात आली़ राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय संघ २५ जुलै रोजी वेल्सविरुद्धच्या लढतीने आपल्या अभियानची सुरुवात करेल़ त्यानंतर २६ जुलैला भारताचा मुकाबला स्कॉटलंडशी होईल़ २९ जुलै रोजी आॅस्ट्रेलिया आणि ३१ जुलै रोजी भारत दक्षिण आफ्रिकेशी सामना करणार आहे़ भारतीय संघाचे प्रशिक्षक टेरी वॉल्श म्हणाले, या स्पर्धेसाठी भारतीय संघाची चांगली तयारी झाली आहे़ कोणत्याही संघाचा सामना करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत़ भारतीय संघ सुवर्णपदक जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. (वृत्तसंस्था)

Web Title: Sardar Singh retired as captain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.