सरदार सिंगला हटवले, श्रीजेश भारतीय हॉकी संघाचा नवा कर्णधार
By Admin | Updated: July 12, 2016 14:17 IST2016-07-12T14:00:37+5:302016-07-12T14:17:43+5:30
भारतीय हॉकी संघाच्या कर्णधारपदावरुन सरदार सिंगला हटवण्यात आले असून, त्याच्या जागी पीआर श्रीजेशची कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

सरदार सिंगला हटवले, श्रीजेश भारतीय हॉकी संघाचा नवा कर्णधार
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १२ - भारतीय हॉकी संघाच्या कर्णधारपदावरुन सरदार सिंगला हटवण्यात आले असून, त्याच्या जागी पीआर श्रीजेशची कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महिला हॉकी संघाच्या कर्णधारपदी सुशीला चानूची निवड करण्यात आली असून दिपीकाला उपकर्णधार बनवण्यात आले आहे.
काही महिन्यांपूर्वी सरदार सिंगवर एका ब्रिटीश महिलेने लैंगिक छळाचा आरोप केला होता. सरदार सिंगने आपला मानसिक, शारीरीक आणि भावनिक छळ केल्याचा आरोप पिडित महिलेने केला होता. लग्नाचे आमिष दाखवून सरदार सिंगने आपला वापर केल्याचा आरोप पिडित तरुणीने केला होता.