अमेरिकन ‘मोहिमे’मुळे सॅप ब्लाटर हैराण
By Admin | Updated: June 1, 2015 01:43 IST2015-06-01T01:43:16+5:302015-06-01T01:43:16+5:30
फिफा अध्यक्ष सेप ब्लाटर यांनी अमेरिकेच्या भ्रष्टाचारविरोधी तपासकर्त्यांकडून अवलंबलेल्या पद्धतीवर आश्चर्य व्यक्त केले आहे.

अमेरिकन ‘मोहिमे’मुळे सॅप ब्लाटर हैराण
ज्युरीख : फिफा अध्यक्ष सेप ब्लाटर यांनी अमेरिकेच्या भ्रष्टाचारविरोधी तपासकर्त्यांकडून अवलंबलेल्या पद्धतीवर आश्चर्य व्यक्त केले आहे. तथापि, आपण त्यांच्या निशाण्यावर नव्हतो, असेही आवर्जून सांगितले.
स्वीत्झर्लंडचे ७९ वर्षीय क्रीडा प्रशासकांनी पुन्हा एकदा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यानंतर आक्रमक पवित्रा अवलंबला. त्यांनी युरोपियन फुटबॉल पदाधिकाऱ्यांच्या ‘द्वेषपूर्ण’ मोहिमेवर कडाडून टीका केली.
अमेरिकन भ्रष्टाचारविरोधी तपासकर्त्यांद्वारे ज्युरीख येथून सात फिफा अधिकाऱ्यांना अटक करून फिफा काँग्रेसमध्ये अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला, अशी आपल्याला शंका वाटत असल्याचे ब्लाटर यांनी सांगितले.
रशियन टीव्ही चॅनलशी बोलताना ते म्हणाले की, ‘काही बाबींवर दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही. २0२२ वर्ल्डकप यजमानपदाच्या दावेदारांपैकी अमेरिकाही होता आणि ते पराभूत झाले. तथापि, असे होऊ शकेल हे आपण विश्वासाने सांगू शकत नाही.’
ब्लाटर यांनी अमेरिकेच्या जॉर्डनला ‘नंबर एक प्रायोजक’ असल्याचे सांगितले. जॉर्डनचे प्रिन्स अली बिन अल हुसैन फिफा ब्लाटर यांचे प्रतिस्पर्धी होते.
ब्लाटर यांनी अमेरिकी न्यायपालिकेद्वारे फिफाविषयी देण्यात आलेल्या विधानांवरही टीका केली. अॅटर्नी जनरल लोरेटा लिंच यांनी फुटबॉलच्या मुळापर्यंत पोहोचलेल्या भ्रष्टाचारावर टीका केली होती. तसेच अन्य एका अधिकाऱ्यांनी ‘धोकेबाजीचा विश्वकप’ असे म्हटले होते. (वृत्तसंस्था)
याविषयी ब्लाटर म्हणाले की, ‘मी फिफा अध्यक्ष असल्याने कोणाविषयी आणि संघटनाविषयी असे विधान कधीही देणार नाही.’
माजी फिफा उपाध्यक्ष जॅक वॉर्नर यांना एक कोटी डॉलर रक्कम देण्यास मान्यता दिल्याच्या अमेरिकेच्या तपासकर्त्यांच्या म्हणण्यासही ब्लाटर यांनी नकार दिला. या घटनेने धक्का बसल्याचे ते म्हणाले.
२00८ मध्ये एका उच्चपदस्थ फिफा अधिकाऱ्याने उत्तर आणि मध्य अमेरिका महासंघाचे माजी प्रमुख वॉर्नर यांना एक डॉलर रक्कम देण्यास मंजुरी दिली होती आणि ही रक्कम लाच म्हणून देण्यात आली होती, असे अमेरिकेच्या तपासकर्त्यांचे म्हणणे आहे. याविषयी ब्लाटर म्हणाले की, मी आरोपात पडू इच्छित नाही. जर अशा काही बाबींची चौकशी होत असेल तर होऊ द्या; परंतु त्यांच्या निशाण्यावर मी नाही. (वृत्तसंस्था)