शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

टीम इंडियात भाव मिळेना! स्टार विकेट किपर बॅटर दुसऱ्या फिल्डमध्ये शिरून झाला संघ मालक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2024 11:29 IST

क्रिकेटच्या पलिकडे जाऊन हा स्टार विकेट किपर बॅटर फुटबॉलशी कनेक्ट झाला आहे. 

एका बाजूला भारतीय क्रिकेट संघ बांगलादेश विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी सज्ज झालाय. दुसरीकडे टीम इंडियात भाव मिळत नसलेला स्टार विकेट किपर बॅटर फुटबॉलमधील एन्ट्रीमुळे चर्चेत आलाय. आयपीएल स्पर्धेत राजस्थान रॉयल्स संघाची कॅप्टन्सी करणाऱ्या संजू सॅमसन याने एक मोठा निर्णय घेतला. क्रिकेटच्या पलिकडे जाऊन हा स्टार विकेट किपर बॅटर फुटबॉलशी कनेक्ट झाला आहे. 

संजूची मालकी तोऱ्यात फुटबॉल क्षेत्रात एन्ट्री 

आयपीएलमध्ये कुणाच्या तरी मालकीच्या संघाचे नेतृत्व करणारा संजू सॅमसन फुटबॉलच्या रिंगणात खेळणाऱ्या संघाचा  सह मालक झाला आहे. केरळ फुटबॉल लीगमध्ये खेळणाऱ्या लोकप्रिय संघाशी कनेक्ट झाल्याची माहिती त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केली आहे. 

ऐतिहासिक विजयानंतर करण्यात आली संजू कनेक्ट झाल्याची घोषणा

संजू सॅमसन हा केरळ सुपर लीग (KSL) स्पर्धेत सहभागी असणाऱ्या मल्लपुरम एफसी संघाच्या सह मालकाच्या भूमिकेसाठी सज्ज झालाय.  मलप्पुरम एफसीनं ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर लगेच स्टार क्रिकेटर आपल्याशी जोडला गेल्याची माहिती शेअर केली आहे.  या संघाने कोच्चीच्या जवाहरलाल नेहरू आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर फोर्का कोच्चीवर २-१ असा विजय नोंदवला.  मलप्पुरम एफसी संघ जिल्ह्यातील पय्यानाड स्टेडियमवर आपल्या घरचे सामने खेळतो. या स्टेडियवर ३० हजार प्रेक्षक सामन्याचा आनंद घेऊ शकतात.  

KSL चा पहिला हंगाम, या लीगमध्ये  किती संघांचा समावेश?

संजू सॅमसन ज्या फुटबॉल संघाचा सह मालक झाला आहे त्या ग्रुपमध्ये त्याच्या अन्य सहकाऱ्यांमध्ये व्हीए अजमल बिस्मी, डॉ. अन्वर अमीन चेलाट आणि बेबी नीलाम्बरा यांचा समावेश आहे. यावर्षी केरळ सुपर लीगचा अर्थात KSL चा पहिला हंगाम आहे. या लीगमध्ये सहा संघ सहभागी आहेत. ही स्पर्धा भारतीय फुटबॉलशी थेट कनेक्ट नाही. पण प्रतिभावंत खेळाडूंचा शोध घेण्यासाठी ही स्पर्धा निश्चितच महत्त्वपूर्ण ठरेल.  

टॅग्स :Sanju Samsonसंजू सॅमसनFootballफुटबॉलKeralaकेरळIndian Cricket Teamभारतीय क्रिकेट संघ