जागतिक ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेसाठी संजना सज्ज
By Admin | Updated: October 24, 2015 02:47 IST2015-10-24T02:47:43+5:302015-10-24T02:47:43+5:30
पेरु येथील लिमा शहरात रंगणाऱ्या १७ व्या जागतिक ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेसाठी भारतीय (१९ वर्षांखालील) संघात मुंबईच्या संजना संतोषची निवड झाली. तर मुलांमध्ये चिराग

जागतिक ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेसाठी संजना सज्ज
मुंबई : पेरु येथील लिमा शहरात रंगणाऱ्या १७ व्या जागतिक ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेसाठी भारतीय (१९ वर्षांखालील) संघात मुंबईच्या संजना संतोषची निवड झाली. तर मुलांमध्ये चिराग शेट्टीची वर्णी लागली आहे. गुजरातची अव्वल खेळाडू अनुष्का पारीखसह संजना दुहेरी गटात विजेतेपदासाठी लढेल. चीन, इंडोनेशिया, थायलँड आणि युरोपीयन देशांच्या खेळाडूंचा सहभाग असलेल्या या स्पर्धेतील दुहेरीच्या लढती ४ ते ८ नोव्हेंबर पर्यंत रंगणार असून एकेरी सामने १० ते १५ नोव्हेंबर दरम्यान होतील.
स्पर्धेबाबत संजना म्हणाली, गेली अनेक महिन्यांच्या अथक परिश्रमामुळे मला जागतिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. आतंरराष्ट्रीय खेळाडू उदय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मी या स्पर्धेसाठी सज्ज असून अनुष्कासह भारतासाठी चमकदार खेळ करण्याचा पुर्ण प्रयत्न असेल. चर्चगेटच्या एच.आर. कॉलेजमध्ये कॉमर्स प्रथम वर्षात शिकणारी संजना वयाच्या आठव्या वर्षापासून बॅडमिंडन खेळत आहे. नुकत्याच पुणे येथे झालेल्या पुणे ज्युनियर आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत तीने रौप्यपदकावर नाव कोरले. त्याचप्रमाणे गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये झालेल्या आॅल इंडिया ज्युनियर नॅशनल स्पर्धेत देखील तीने रौप्य पदकावर कब्जा केला.