सानियाचा विक्रम, विम्बल्डनमध्ये महिला दुहेरीत मारली बाजी
By Admin | Updated: July 12, 2015 12:35 IST2015-07-12T10:16:36+5:302015-07-12T12:35:43+5:30
भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाने तिची स्वित्झर्लंडची जोडीदार मार्टिना हिंगीसच्या साथीने विम्बल्डनमधील महिला दुहेरीचे विजेतेपद पटकावले आहे.

सानियाचा विक्रम, विम्बल्डनमध्ये महिला दुहेरीत मारली बाजी
ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. १२ - भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाने तिची स्वित्झर्लंडची जोडीदार मार्टिना हिंगीसच्या साथीने विम्बल्डनमधील महिला दुहेरीचे विजेतेपद पटकावले आहे. सानिया विम्बल्डन पुरस्कार पटकावणारी पहिली भारतीय महिला टेनिसपटू ठरली असून मार्टिना हिंगीसनेही तब्बल १७ वर्षांंनी विम्बल्डनमध्ये बाजी मारली आहे.
शनिवारी विम्बल्डनमध्ये महिला दुहेरीच्या फायनलमध्ये सानिया - हिंगीस व रशियाची एकाटेरिना मकारोवा-एलेना वेस्नीना ही जोडी आमने सामने होती. मकारोवा - वेस्नीनाने पहिल्या सेटमध्ये सानिया - हिंगीसवर ७-५ ने मात करत सामन्यात आघाडी घेतली. यानंतर सानिया व हिंगीसने झुंजार खेळी करत लागोपाठ दोन सेटमध्ये विजय मिळवत स्पर्धेचे जेतेपद पटकावले. सानिया मिर्झा व मार्टिना हिंगीस या जोडीने ५-७, ७-६ (७-४), ७-५ ने हा सामना जिंकला.