‘खेलरत्न’साठी सानियाची अधिकृत शिफारस
By Admin | Updated: August 2, 2015 01:31 IST2015-08-02T01:31:03+5:302015-08-02T01:31:03+5:30
विम्बल्डन दुहेरीची चॅम्पियन भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा हिच्या नावाची राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी अधिकृत शिफारस करण्यात आल्याची माहिती क्रीडा मंत्रालयाने शनिवारी दिली

‘खेलरत्न’साठी सानियाची अधिकृत शिफारस
नवी दिल्ली : विम्बल्डन दुहेरीची चॅम्पियन भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा हिच्या नावाची राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी अधिकृत शिफारस करण्यात आल्याची माहिती क्रीडा मंत्रालयाने शनिवारी दिली. याबाबत अंतिम निर्णय पुरस्कार निवड समिती घेईल.
सानियाने जूनमध्ये आॅल इंग्लंड क्लबवर स्वित्झर्लंडची जोडीदार मार्टिना हिंगीससोबत करिअरमधील पहिले महिला दुहेरीचे जेतेपद पटकावले होते. त्याआधी दुहेरीच्या जागतिक क्रमवारीत अव्वल खेळाडूदेखील बनली. क्रीडामंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी या कामगिरीबद्दल सानियाच्या नावाची शिफारस खेलरत्नसाठी केल्याची माहिती क्रीडा सचिव अजित शरण यांनी दिली.
एआयटीएकडून आम्हाला उशिरा शिफारस मिळाल्याची माहिती शरण यांनी दिली. खेलरत्नच्या चढाओढीत सानियाला दीपिका पल्लिकल आणि थाळीफेकपटू विकास गौडा यांच्याकडून आव्हान मिळण्याची शक्यता आहे. (वृत्तसंस्था)