जुलै महिन्यात सानियाची आत्मकथा प्रकाशित होणार
By Admin | Updated: May 4, 2016 21:01 IST2016-05-04T21:01:57+5:302016-05-04T21:01:57+5:30
भारतीय स्टार सानिया मिर्झा हिच्या आयुष्यातील चढ-उतारांचा लेखाजोखा तिच्या चाहत्यांपुढे लवकरच येणार आहे.
जुलै महिन्यात सानियाची आत्मकथा प्रकाशित होणार
नवी दिल्ली, दि. 4- टेनिस क्षेत्रात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारी भारतीय स्टार सानिया मिर्झा हिच्या आयुष्यातील चढ-उतारांचा लेखाजोखा तिच्या चाहत्यांपुढे लवकरच येणार आहे. येत्या जुलैमध्ये सानियाने आपल्या वडिलांच्या मदतीने लिहिलेल्या ‘एस अगेन्स्ट आॅड्स’या आत्मकथेचे प्रकाशन करण्यात येईल. या पुस्तकाचे प्रकाशन हार्पर कॉलिस करणार आहे. हार्पर कॉलिसचे मुख्य संपादक कार्तिक वी. के. यांनी यावर आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, सानिया ही देशातील स्टार खेळाडू आहे. टेनिस क्षेत्रात तिने खूप मोठे यश मिळवले आहे. सानियाच्या आत्मकथेतून तिच्या आयुष्यातील चांगले-वाईट अनुभव बाहेर येतील. खेळाडू म्हणून तिने केलेला संघर्ष हा चाहत्यांसाठी खूप मोठा प्रेरणादायी विषय ठरेल.
२९ वर्षीय सनिया म्हणाली, या आत्मकथेत मी केवळ १६ वर्षांची असताना मिळवलेल्या विम्बल्डन ग्रॅण्डस्लॅममधील महिला दुहेरीतील जेतेपदापासून तर अव्वल खेळाडू बनल्यापर्यंतचा प्रवास अधोरेखित केला आहे. हे पुस्तक पुढील पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास आहे. या पुस्तकात कोर्टाबाहेरीलही काही अनुभव शेअर करण्यात आले आहे.