सानिया-सोरेसला मिश्र दुहेरीचे जेतेपद
By Admin | Updated: September 6, 2014 01:36 IST2014-09-06T01:36:26+5:302014-09-06T01:36:26+5:30
भारताची अव्वल टेनिसपटू सानिया मिर्झा व ब्राझीलचा ब्रूनो सोरेस या जोडीने अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेतील मिश्र दुहेरीत विजेतेपद जिंकले.

सानिया-सोरेसला मिश्र दुहेरीचे जेतेपद
न्यूयॉर्क : भारताची अव्वल टेनिसपटू सानिया मिर्झा व ब्राझीलचा ब्रूनो सोरेस या जोडीने अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेतील मिश्र दुहेरीत विजेतेपद जिंकले. सानियाचे हे मिश्र दुहेरीतील तिसरे ग्रॅण्डस्लॅम विजेतेपद आहे.
सानिया-सोरेसने अमेरिकेच्या एबिगेल स्पीयर्स व मेक्सिकोच्या सँटियागो गोंजालेसचा 6-1, 2-6 (11-9) असा पराभव करून विजेतेपदावर आपला हक्क प्रस्थापित केला. सानियाने यापूर्वी 2क्क्9 ऑस्ट्रेलियन ओपन आणि 2क्12 फ्रेंच ओपन स्पर्धेत महेश भूपतीसह दोन विजेतेपदे जिंकले होते. (वृत्तसंस्था)
महिला दुहेरीत सानिया पराभूत
न्यूयॉर्क : भारताची अनुभवी टेनिसपटू सानिया मिर्झा हिला ङिाम्बाब्वेच्या कारा ब्लॅकसह अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत पराभवाची नामुष्की ओढवली़ सानिया आणि ब्लॅक या जोडीला स्वित्ङरलडची मार्टिना हिंगीस आणि इटलीची फ्लाविया पेनेटा यांच्याकडून 1 तास आणि 1क् मिनिटांर्पयत रंगलेल्या लढतीत 2-6, 4-6 अशा फरकाने मात खावी लागली़ सानिया आणि ब्लॅक या तृतीय मानांकनप्राप्त जोडीला सातपैकी केवळ एक ब्रेकपॉईंटचा लाभ घेता आला़ दुसरीकडे, हिंगीस व पेनेटाने पाचपैकी चार ब्रेकपॉईंटचा लाभ घेऊन सामन्यात बाजी मारली़