Sania Mirza in Australian Open: सानिया मिर्झाचं ऑस्ट्रेलियन ओपनमधील आव्हान संपुष्टात; राजीव रामसोबत मिश्र दुहेरीमध्ये झाली पराभूत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2022 01:46 PM2022-01-25T13:46:41+5:302022-01-25T13:49:19+5:30

ऑस्ट्रेलियन ओपनमधील महिला दुहेरीतील पराभवानंतरच सानियाने निवृत्तीची घोषणा केली होती.

Sania Mirza says goodbye to Australian Open with quarterfinal loss in mixed doubles | Sania Mirza in Australian Open: सानिया मिर्झाचं ऑस्ट्रेलियन ओपनमधील आव्हान संपुष्टात; राजीव रामसोबत मिश्र दुहेरीमध्ये झाली पराभूत

Sania Mirza in Australian Open: सानिया मिर्झाचं ऑस्ट्रेलियन ओपनमधील आव्हान संपुष्टात; राजीव रामसोबत मिश्र दुहेरीमध्ये झाली पराभूत

googlenewsNext

Sania Mirza: ऑस्ट्रेलियन ओपन २०२२ मध्ये सानिया मिर्झाचे आव्हान संपुष्टात आले. राजीव रामसोबत मिश्र दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत तिला पराभवाचा सामना करावा लागला. सानिया मिर्झा आणि राजीव राम यांना जेसन कुबलर आणि जेमी फोर्लिस या ऑस्ट्रेलियन जोडीने सरळ सेटमध्ये ६-४, ७-६ (७-५) असं पराभूत केले. हा सामना सुमारे दीड तास चालला. या पराभवासह सानिया मिर्झा ऑस्ट्रेलियन ओपनमधून बाहेर झाली.

महिला दुहेरीत तिला पहिल्याच फेरीत पराभव पत्करावा लागला होता. तिच्या कारकिर्दीतील हा शेवटचा ऑस्ट्रेलियन ओपनचा सामना होता. सानिया मिर्झाने नुकतेच जाहीर केले होते की, हा तिच्या टेनिस कारकिर्दीचा शेवटचा हंगाम असेल.

उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात सानिया आणि राजीव या जोडीची सर्व्हिस दोनदा ब्रेक झाली. अशा स्थितीत कुबलर आणि फोर्लिस या ऑस्ट्रेलियन जोडीने पहिला सेट सहज जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये सानिया-राजीव जोडीने झुंज देत सेट टायब्रेकरपर्यंत खेचला. पण टायब्रेकरमध्ये ऑस्ट्रेलियन जोडीनेच बाजी मारली. त्यामुले सानिया मिर्झाचे ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये विजेतेपद पटकावण्याचे स्वप्न अपूर्णच राहिलं.

Web Title: Sania Mirza says goodbye to Australian Open with quarterfinal loss in mixed doubles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.