सानिया - मार्टिनाने जिंकली वुहान ओपन ट्रॉफी
By Admin | Updated: October 3, 2015 13:50 IST2015-10-03T13:50:13+5:302015-10-03T13:50:13+5:30
सानिया मिर्झा व मार्टिना हिंगीस या द्वयीने वुहान ओपन वुमेन डबल्स ट्रॉफी जिंकली असून विजयी घोडदौड कायम राखली आहे.

सानिया - मार्टिनाने जिंकली वुहान ओपन ट्रॉफी
>ऑनलाइन लोकमत
वुहान, दि. ३ - सानिया मिर्झा व मार्टिना हिंगीस या द्वयीने वुहान ओपन वुमेन डबल्स ट्रॉफी जिंकली असून विजयी घोडदौड कायम राखली आहे. टॉप सीडेड असलेल्या सानिया-मार्टिना जोडीने जिंकलेली ही सातवी स्पर्धा आहे.
या जोडीने कॅमेलिया बेगू व मोनिका निकूलेसू या जोडीचा ६ -२, ६ - ३ असा पराभव केला. ही स्पर्धा जिंकल्यानंतर सानियाने टायटल नंबर ७ असा संदेश फोटोसह ट्विटरवर पोस्ट केला आहे. पहिल्या फेरीत बाय मिळालेल्या सानिया - मार्टिना जोडीला नंतरच्या फे-यांमध्येही फारसा प्रतिकार झाला नाही.
आत्तापर्यंत त्यांनी इंडियन वेल्स, मियामी, चार्ल्सटन, विम्बल्डन, दी युएस ओपन, ग्वांग्झी आणि वुहान अशा सात स्पर्धा जिंकल्या आहेत. आता त्यांच्यासमोर बीजिंगमध्ये चायना ओपन जिंकण्याचे आव्हान आहे.