सानिया-हिंगीसचा दबदबा कायम, सलग ४०वा विजय मिळवत सेंट पीटर्सबर्ग कप जिंकला
By Admin | Updated: February 14, 2016 19:08 IST2016-02-14T19:08:57+5:302016-02-14T19:08:57+5:30
सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगीस या दुहेरी जोडीने टेनिस विश्वातील आपला दबदबा कायम ठेवत सेंट पीटर्सबर्ग लेडीज ट्राफी स्पर्धेच्या विजेतेपदावर कब्जा केला.

सानिया-हिंगीसचा दबदबा कायम, सलग ४०वा विजय मिळवत सेंट पीटर्सबर्ग कप जिंकला
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १४ - सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगीस या दुहेरी जोडीने टेनिस विश्वातील आपला दबदबा कायम ठेवत त्यांनी सात लाख ५३ हजार डॉलर चा पुरस्कार असणारी सेंट पीटर्सबर्ग लेडीज ट्राफी टूर्नामेंटच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेच्या विजेतेपदावर कब्जा केला.
गतवर्षी विजेतेपदांचा धडाका लावलेल्या या जोडीने या वर्षातील सलग चौथे विजेतेपद मिळवले. विशेष म्हणजे यासह सानिया - हिंगीस यांनी सलग ४० सामने जिंकण्याचा जागतिक विक्रमही नोंदवला आहे. महिला दुहेरीचे पहिले मानांकन असलेल्या या जोडीने रूसच्या वेरा दुशेविना आणि चेक गणराज्यची बारबोरा क्रेजिकोवा यांचा आज (रविवार) मात्र 56 मिनटाच्या खेळात ६-३,६-१ अशा सरळ दोन सेटमध्ये पराभव केला आहे.
या जोडीने यावर्षी ब्रिसबेन, सिडनी और आस्ट्रेलियन ओपन नंतर सेंट पीटर्सबर्ग इथे खिताब जिंकत सलग ४० सामने जिंकण्याचा पराक्रम केला आहे. गेल्या वर्षी यूएस ओपन पासून ही अग्रमानंकित जाडी अपराजित आहे.