सानिया-हिंगीसचा विक्रमी २९वा विजय
By Admin | Updated: January 14, 2016 19:30 IST2016-01-14T19:30:01+5:302016-01-14T19:30:01+5:30
भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि तिची स्विस जोडीदार मार्टिना हिंगीस या अव्वल जोडीने आज (गुरुवार) सलग २९ वा विजय मिळवताना महिला दुहेरीचा २२ वर्षापुर्वीचा जागतिक विक्रम मोडीत काढला आहे

सानिया-हिंगीसचा विक्रमी २९वा विजय
>ऑनलाइन लोकमत,
सिडनी, दि. १४ - भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि तिची स्विस जोडीदार मार्टिना हिंगीस या अव्वल जोडीने आज (गुरुवार) सलग २९ वा विजय मिळवताना महिला दुहेरीचा २२ वर्षापुर्वीचा जागतिक विक्रम मोडीत काढला आहे. या विजयासह सानिया- हिंगस जोडीने सिडनी आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेच्या अंतीम फेरीत प्रवेश मिळवला आहे. त्यांनी सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगिसनं रोमानियाच्या रालुसा ओलारू आणि कझाकस्तानच्या यारोस्लावा श्वेडोवाचं आव्हान ४-६, ६-३, १०-८ असं संपुष्टात आणलं.
गतवर्षी एकत्र आलेल्या सानिया-हिंगीस यांनी एकामागोमाग एक विजेतेपदांचा धडाका लावताना १० डब्ल्यूटीए दुहेरी स्पर्धा जिंकल्या. तसेच यंदाच्या वर्षाची दणक्यात सुरुवात करताना या अव्वल जोडीने ब्रिस्बेन आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.