सानिया-हिंगिस जोडी फुटली ...!

By Admin | Updated: August 10, 2016 06:33 IST2016-08-10T06:33:16+5:302016-08-10T06:33:16+5:30

इंडो-स्विस जोडीनं वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. सानिया यापुढच्या काळात चेक रिपब्लिकच्या बार्बरा स्ट्रायकोवाच्या साथीनं खेळणार असून, अमेरिकेची कोको वॅन्देवेघे ही मार्टिनाची जोडीदार बनली आहे.

Sania-Hingis pair splits ...! | सानिया-हिंगिस जोडी फुटली ...!

सानिया-हिंगिस जोडी फुटली ...!

>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १० : सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगिस जोडीने गेली दोन वर्षे महिला टेनिस दुहेरीमध्ये आपला दबदबा कायम ठेवला होता. सुत्रांच्या माहिताप्रमाणे इंडो-स्विस जोडीनं वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. सानिया यापुढच्या काळात चेक रिपब्लिकच्या बार्बरा स्ट्रायकोवाच्या साथीनं खेळणार असून, अमेरिकेची कोको वॅन्देवेघे ही मार्टिनाची जोडीदार बनली आहे.
 
दोघींच्या या निर्णयामुळे टेनिस जगात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तर चाहत्यांना धक्का बसला आहे. गेल्या वर्षभरात सानिया आणि मार्टिनानं नऊ किताब आणि डब्ल्यूटीए विजेतेपद जिंकून महिला दुहेरीत आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला होता. सानियानं मार्टिना हिंगिसच्या साथीनं महिला दुहेरीच्या क्रमवारीत अव्वल स्थानावरही झेप घेतली होती. 
 

Web Title: Sania-Hingis pair splits ...!