सानिया-हिंगीस जोडी उपांत्यपूर्व फेरीत
By Admin | Updated: January 13, 2016 03:55 IST2016-01-13T03:55:29+5:302016-01-13T03:55:29+5:30
जागतिक क्रमवारीतील नंबर वन दुहेरी जोडी सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगीस यांनी लौकिकास साजेसा खेळ करताना सिडनी इंटरनॅशनल टेनिस स्पर्धेत प्रतिस्पर्धी खेळाडूंना धूळ चारून

सानिया-हिंगीस जोडी उपांत्यपूर्व फेरीत
सिडनी : जागतिक क्रमवारीतील नंबर वन दुहेरी जोडी सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगीस यांनी लौकिकास साजेसा खेळ करताना सिडनी इंटरनॅशनल टेनिस स्पर्धेत प्रतिस्पर्धी खेळाडूंना धूळ चारून उपांत्यपूर्व फेरीत मजल मारली.
भारत आणि स्वीत्झर्लंडच्या या जोडीने आपले विजयी अभियान कायम राखताना सलग २७ वा विजय मिळविला. सानिया आणि मार्टिना यांनी महिला दुहेरीच्या पहिल्या फेरीत आॅस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या एनास्तासिया रोडियोनोव्हा आणि एरिना रोडियोनोव्हा या जोडीवर सरळ सेटमध्ये ६-२, ६-३ अशी मात करीत अंतिम ८ खेळाडूंत आपली जागा निश्चित केली.
स्पर्धेतील पुरुष दुहेरी गटातील सामन्यात भारताच्या रोहन बोपन्ना याने रोमानियाच्या फ्लोरिन मेर्जियासह जबरदस्त कामगिरी करताना स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. या जोडीने चौथे मानांकन प्राप्त जोडी डेनिस इस्तोमिन आणि हेनरी कोटिनेन यांच्यावर तीन सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत ६-७, ६-३, १०-८ असा विजय मिळविला. (वृत्तसंस्था)