सानिया-हिंगीस जोडी वर्षात दहाव्यांदा अंतिम फेरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2015 03:04 IST2015-11-01T03:04:49+5:302015-11-01T03:04:49+5:30
भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि स्विर्त्झलंडची मार्टिना हिंगीस जोडीने डब्ल्यूटीए फायनल्सच्या अंतिम फेरीत धडक मारली. सानिया - मार्टिना जोडीने उपांत्य सामन्यात चीनी

सानिया-हिंगीस जोडी वर्षात दहाव्यांदा अंतिम फेरीत
सिंगापूर : भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि स्विर्त्झलंडची मार्टिना हिंगीस जोडीने डब्ल्यूटीए फायनल्सच्या अंतिम फेरीत धडक मारली. सानिया - मार्टिना जोडीने उपांत्य सामन्यात चीनी तैपईच्या चान हाओ चिंग - चान यंग जान यांना ६-४, ६-२ असे सरळ सेटमध्ये हरवून फायनलमध्ये प्रवेश मिळवला.
विशेष म्हणजे ही जोडी यंदाच्या वर्षात दहाव्यांदा फायनलमध्ये पोहचली आहे. शिवाय चान बहिणींना हरवून या या जोडीने सलग विसाव्या विजयाची नोंद केली आहे.
सानिया-हिंगीस जोडीने आपली शेवटचा पराभव या चान बहिणींकडूनच स्वीकारला होता. पण त्यानंतर सानिया-हिंगीसने त्यांना तिनदा हरविले आहे. आजही ही परंपरा कायम राहीली. चिनी तैपईच्या तृतीय मानांकित जोडीने सुरवात चांगली केली. पहिल्या सेटमध्ये आघाडी घेतली परंतु सानिया-हिंगीस जोडीने १४ पैकी ११ गेम जिंकून विरोधी जोडीतील आव्हानातील हवा काढून घेतली. सानिया आणि हिंंगीस जोडी यंदा आठ स्पर्धेत जिंकली आहे. यात विम्बल्डन, अमेरिकन ओपन या दोन ग्रँडस्लॅमसह मियामी, इंडियाना वेल्स, वुहान, बिजिंग ओपन, चार्ल्सटन, ग्वांग्झू आदी महत्त्वपूर्ण स्पर्धांचा समावेश आहे.(वृत्तसंस्था)
विरुद्ध खेळाडूचा प्रत्येक वेळी खेळ वेगळा असतो, त्याला अनुसरून रणनिती आखावी लागते. आज एक वेगळी रणनिती ठरवून आम्ही मैदानात उतरलो आणि त्यात यशस्वी झालो.
- सानिया मिर्झा