सानिया-हिंगीसला पराभवाचा धक्का

By Admin | Updated: March 15, 2016 03:21 IST2016-03-15T03:21:32+5:302016-03-15T03:21:32+5:30

जागतिक क्रमवारीतील नंबर वन महिला दुहेरीची जोडी, तसेच गत चॅम्पियन भारताची सानिया मिर्झा आणि स्वीत्झर्लंडची मार्टिना हिंगीस यांना इंडियन वेल्स टेनिस स्पर्धेच्या

Sania-Hingis defeats defeat | सानिया-हिंगीसला पराभवाचा धक्का

सानिया-हिंगीसला पराभवाचा धक्का

कॅलिफोर्निया : जागतिक क्रमवारीतील नंबर वन महिला दुहेरीची जोडी, तसेच गत चॅम्पियन भारताची सानिया मिर्झा आणि स्वीत्झर्लंडची मार्टिना हिंगीस यांना इंडियन वेल्स टेनिस स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत सनसनाटी पराभवाचा सामना करावा लागला.
अव्वल मानांकित जोडीला दुसऱ्या फेरीत अमेरिकेच्या वानिया किंग आणि रशियाच्या एला कुद्रयावत्सेवा यांच्याकडून एक तास २३ मिनिटे रंगलेल्या लढतीत सलग सेटमध्ये ६-७, ४-६ असा पराभवाचा सामना करावा लागला. याआधी त्यांनी पहिल्या फेरीत आॅस्ट्रेलियाच्या कॅसी डेलाकुआ आणि सामंथा स्टोसूर यांचा पराभव केला होता. या वर्षी ग्रँडस्लॅम आॅस्ट्रेलियन ओपनसह चार स्पर्धेत विजेतेपद पटकावणाऱ्या भारतीय-स्वीस जोडीला सलग ४१ वेळेसची विजयाची लय गत महिन्यात कतार ओपनच्या क्वॉर्टर फायनलमध्ये तुटली होती. (वृत्तसंस्था)

Web Title: Sania-Hingis defeats defeat