सानियाच्या खेलरत्नवर अडवाणीकडून टीका
By Admin | Updated: September 3, 2015 00:07 IST2015-09-02T23:40:00+5:302015-09-03T00:07:31+5:30
भारताची टेनिसस्टार सानिया मिर्झाला नुकत्याच देण्यात आलेल्या ‘राजीव गांधी खेलरत्न’ पुरस्कारावर आघाडीचा स्नूकरपटू पंकज अडवाणीने टीका केली आहे.

सानियाच्या खेलरत्नवर अडवाणीकडून टीका
नवी दिल्ली : भारताची टेनिसस्टार सानिया मिर्झाला नुकत्याच देण्यात आलेल्या ‘राजीव गांधी खेलरत्न’ पुरस्कारावर आघाडीचा स्नूकरपटू पंकज अडवाणीने टीका केली आहे.
अडवाणी म्हणाला, की मला वाटते की सर्वच खेळांना समान महत्त्व दिले जाते; मात्र सानियाला दुहेरीत नंबर एक खेळाडू बनल्याबद्दल ‘खेलरत्न’ देण्यात आला आहे. तिची कामगिरीही सामूहिक आहे.
तेरा वेळा जागतिक स्नूकर स्पर्धा जिंकणाऱ्या अडवाणीने भेदभावाचा आरोप लावला आहे. ‘स्नूकरबद्दल बोलायचे झाल्यास अनेक वेळा राष्ट्रीय विजेती व २०१३ ची जागतिक
विजेती विद्या पिल्लईने ‘अर्जुन पुरस्कारा’साठी अर्ज केला होता; मात्र तिच्या कामगिरीकडे दुर्लक्ष करण्यात आले. पुरस्कार देताना निवड करण्यासाठी इतका भेदभाव का केला जातो, असा प्रश्नही त्यांनी या वेळी विचारला.
सानिया मिर्झाला २९ आॅगस्टला राष्ट्रपती भवन येथे ‘राजीव गांधी खेलरत्न’ पुरस्काराने गौरविण्यात आले. अडवाणीशिवाय अन्य काही खेळाडूंनीही यावर आक्षेप घेतला
आहे. पॅरालिम्पिक खेळाडू एच. एन. गिरीश याने याविरुद्ध कर्नाटक उच्च न्यायालयात धाव घेतली होती.