सानिया, बोपण्णा, पेसचे जोडीदारांसह विजय

By Admin | Updated: May 28, 2015 01:37 IST2015-05-28T01:37:11+5:302015-05-28T01:37:11+5:30

जगप्रसिद्ध फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत बुधवारी भारतीय जोडींनी कमाल केली. लिएंडर पेस, महेश भूपती आणि सानिया मिर्झा या खेळाडूंनी आपल्या जोडीदारांसह विजय मिळवत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.

Sania, Bopanna, Pace pair together | सानिया, बोपण्णा, पेसचे जोडीदारांसह विजय

सानिया, बोपण्णा, पेसचे जोडीदारांसह विजय

पॅरिस: जगप्रसिद्ध फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत बुधवारी भारतीय जोडींनी कमाल केली. लिएंडर पेस, महेश भूपती आणि सानिया मिर्झा या खेळाडूंनी आपल्या जोडीदारांसह विजय मिळवत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.
भारताचा अनुभवी स्टार खेळाडू लिएंडर पेस याने कॅनडाचा त्याचा जोडीदार डॅनियल नेस्टर याच्या साथीने जेम्स डकवर्थ आणि क्रिस गुसियान या जोडीवर मात केली. हा सामना तीन सेटपर्यंत चालला. दुसऱ्या सेटमध्ये पेस-नेस्टर जोडीला संघर्ष करावा लागला. प्रयत्नानंतरही त्यांनी हा सेट ५-७ ने गमावला. अखेर तिसऱ्या आणि निर्णायक सेटमध्ये त्यांनी मुसंडी मारत ७-५ ने बाजी मारली. सामन्यात पेस-नेस्टर जोडीने पाचपैकी तीन ब्रेक पॉर्इंट वाचवले. आता या जोडीचा सामना एरिक बुटोरॅँक आणि सॅम ग्रोथ किंवा आंद्रे बेगेमन आणि ज्युलियननोल या जोडीविरुद्ध होणार आहे. दुसरीकडे, भारतीय खेळाडू रोहन बोपण्णा आणि त्याचा जोडीदार फ्लोरियन मार्जिया यांनी पहिल्या फेरीत फिलिप क्राजिनोविच आणि व्हिक्टर ट्रायोकी या जोडीचा ५-७, ६-३, ६-४ ने पराभव केला. या पराभवानंतर मार्जिया-ट्रायोकी या जोडीला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. त्यानंतर महिला गटात, सुपरफॉर्ममध्ये असलेल्या सानियाने तिची जोडीदार मार्टिना हिंगीससोबत शानदार प्रदर्शन केले. हा सामना त्यांनी सहज जिंकला. या जोडीने जर्मनीची ज्युलिया जॉर्जेस आणि चेक गणराज्यची बारबोरा क्रासिकोरा या जोडीचा ६-३, ६-० अशा सरळ सेटमध्ये पराभव केला. याबरोबरच त्यांनी दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.

‘फेड एक्स्प्रेस’ची आगेकूच
१७ ग्रॅण्डस्लॅम पटकाविणाऱ्या स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. त्याने स्पेनच्या मार्सेल ग्रॅनोलर्सवर ६-२, ७-६ (१), ६-३ ने पराभव केला. दुसऱ्या मानांकित फेडररला दुसऱ्या सेटमध्ये मात्र संघर्ष करावा लागला. ५७ व्या क्रमांकावर असलेल्या मार्सेलविरुद्ध त्याने दोन वेळा सर्व्हिस गमावली. हा सेट टायब्रेकरपर्यंत आला होता. अखेर निर्णायक सेटमध्ये त्याने बहारदार प्रदर्शन करीत बाजी मारली.

टेनिससुंदरीही जोरात...
टेनिससुंदरी म्हणून जगप्रसिद्ध असलेल्या रशियाच्या मारिया शारापोव्हा हिने विजयी नोंद करीत तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. माजी विजेत्या या खेळाडूने तिच्याच देशाच्या विटालीया डायचेन्को हिचा ६-३, ६-१ अशा सरळ सेटमध्ये पराभव केला. आता तिसऱ्या फेरीत तिचा सामना समंथा स्टोसूर हिच्याविरुद्ध होणार आहे. स्टोसूर
ही गेल्या वेळची उपविजेती
खेळाडू आहे.

 

Web Title: Sania, Bopanna, Pace pair together

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.