सानिया-बार्बरा अंतिम फेरीत

By Admin | Updated: January 13, 2017 01:15 IST2017-01-13T01:15:01+5:302017-01-13T01:15:01+5:30

सानिया मिर्झाने सत्रातील आपल्या दुसऱ्या टूर्नामेंटमध्ये दुसऱ्या किताबाच्या दिशेने कूच

Sania-Barbara finals | सानिया-बार्बरा अंतिम फेरीत

सानिया-बार्बरा अंतिम फेरीत

सिडनी : सानिया मिर्झाने सत्रातील आपल्या दुसऱ्या टूर्नामेंटमध्ये दुसऱ्या किताबाच्या दिशेने कूच करताना आपली चेक गणराज्यची जोडीदार बार्बरा स्ट्राइकोवासोबत मिळून डब्ल्यूटीए इंटरनॅशनल टेनिस स्पर्धेच्या महिला दुहेरीच्या अंतिम फेरीत स्थान पटकाविले आहे़
सानिया आणि बार्बरा या जोडीने अमेरिकेच्या वानिया किंग आणि कझाकिस्तानच्या यारोस्लाव श्वेदोवा या जोडीचा अवघ्या ५१ मिनिटांत ६-१, ६-२ ने हरविले़ उपांत्य फेरीत सानिया-बारबरा या जोडीने सर्व पाच ब्रेक पॉर्इंट वाचविले आणि प्रत्येक सेटमध्ये दोनवेळा विरोधी संघाची सर्व्हिस मोडीत काढली़ सानिया आणि बारबरा यांचा अंतिम सामना टीमिया बाबोस आणि अनास्तासिया पावलिचेनकोवा या जोडीशी होईल़ या जोडीने आंद्रिया क्लेपाक आणि मारिया जोस मार्टिनेज सांचेज या जोडीचा अंतिम चारच्या सामन्यात ६-३, ६-४ ने हरविले़

Web Title: Sania-Barbara finals