सानिया-बार्बरा अंतिम फेरीत

By Admin | Updated: September 24, 2016 05:29 IST2016-09-24T05:29:47+5:302016-09-24T05:29:47+5:30

बार्बरा स्ट्राईकोव्हा यांनी टोरे पॅन पॅसिफिक ओपन टेनिस स्पर्धेच्या महिला दुहेरी गटात अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

Sania-Barbara finals | सानिया-बार्बरा अंतिम फेरीत

सानिया-बार्बरा अंतिम फेरीत


टोकिओ: भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा आणि चेक प्रजासत्ताकची तिची सहकारी बार्बरा स्ट्राईकोव्हा यांनी टोरे पॅन पॅसिफिक ओपन टेनिस स्पर्धेच्या महिला दुहेरी गटात अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
सानिया-स्ट्राईकोव्हा जोडीने उपांत्य सामन्यात कॅनडाची गॅब्रिएला दाबोवस्की आणि स्पेनची मारिया जोस मार्टिना सांचेझ या बिगरमानांकित जोडीला ४-६, ६-३, १0-५ असे हरवून अंतिम फेरी गाठली. आता त्यांची लढत चेन लियांग आणि झाओशुआन यांग किंवा राक्वेल अटोवो आणि एबिगेल स्पीयर्स यांच्यातील विजेत्यासोबत होईल.
सानिया आणि स्ट्राईकोव्हा केवळ तिसऱ्यांदा एकत्र खेळत आहेत. गेल्या महिन्यात या जोडीने मार्टिना हिंगीस आणि कोको वांदेवेघे यांना हरवून सिनसिनाटी ओपन स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. (वृत्तसंस्था)

Web Title: Sania-Barbara finals